Friday, November 22, 2024
Homeजिल्हाKolhapur : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे पोर्टल सुरू करा – लाल बावटा...

Kolhapur : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे पोर्टल सुरू करा – लाल बावटा संघटनेची मागणी

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणी, नूतनीकरण, लाभाचे ऑनलाईन अर्जाचे पोर्टल बंद केले आहे. ते पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेने महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. Kolhapur

निवेदनात म्हटले आहे की, लाभाचे अर्ज भरण्यासाठी कामगार नोंदीत असणे गरजेचे आहे. जो कामगार आचारसंहिता लागण्यापूर्वी, म्हणजेच १६ मार्च २०२४ पूर्वी नोंदीत झालेला आहे अशा कामगारांचे लाभाचे अर्ज भरण्यासाठी पोर्टल सुरू करावे. तसेच नूतनीकरणाचे कामकाज हे रेग्युलर काम असल्याने नूतनीकरणाचे पोर्टलही सुरू करावे. एखाद्या कामगारांचे आचारसंहितेच्या कालावधीत नूतनीकरण न झाल्यास व अशा कामगाराचा अनावधानाने मृत्यू झालेस त्याच्या वारसांना मंडळाकडुन मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. Kolhapur

निवेदनावर लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे भरमा कांबळे, शिवाजी मगदूम यांच्या सह्या आहेत.

whatsapp link

हे ही वाचा :

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव

ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !

संबंधित लेख

लोकप्रिय