Monday, May 6, 2024
Homeआरोग्यकोरोनाकोल्हापूर : सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गेले...

कोल्हापूर : सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गेले असताना पोलिस नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत असल्याचा आरोप

कोल्हापूर : राज्यात तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १५ एप्रिल २०२१ पासून लॉकडॉऊन लागू करण्यात आला आहे. या काळामध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी ७ ते ११ या वेळेत सामान्य नागरिकांना गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्याची मुभा दिलेली आहे. परंतु अशाच परिस्थितीत पोलिस प्रशासन सामान्य नागरिक या वेळेत वस्तू खरेदी करायला बाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संबंधीचे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना पाठविण्यात आले आहे.

नागरिकांनी म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये राजकीय नेते आपल्या गाडीमधून दिवसभर कार्यकर्ते घेऊन फिरत असताना कोणत्याही नेत्यावर कारवाई करत नाही मात्र सामान्य नागरिकाला एक न्याय व नेत्यांना एक न्याय हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून सामान्य नागरिकाला अन्यायकारक बाब आहे. पोलिस प्रशासनाने मागील दोन – तीन दिवसांमध्ये काही वयोवृद्ध लोकांवर गुन्हे दाखल केले असल्याचा ही आरोप नागरिकांनी एका पत्राद्वारे केला आहे.

प्रशासनाने आजपर्यत जनतेच्या हितासाठीच काम केले आहे आणि करीत आहे परंतु सर्वाना समान न्याय, नियम असावेत जेणे करून सामान्य नागरिकांवर अन्याय होतोय असे होऊन जनतेत रोष निर्माण होऊ नये त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांमध्ये किती राजकीय नेत्यांवर पोलिस प्रशासनाने कारवाई केली याचाही खुलासा व्हावा, तसेच सकाळी ७ ते ११ या वेळेत नागरिकांवर कारवाई केली जाऊ नये अशी मागणी रमेश मोरे, अशोक पोवार, दिनानाथ सिंग, विष्णू जोशीलकर, भाऊ घोडके, राजवर्धन यादव, कादर मलबारी, ऍड. रंजीत गावडे, दादा लाड, चंद्रकांत पाटील, अंजुम देसाई, चंद्रकांत सूर्यवंशी, लहुजी शिंदे, महेश जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय