Saturday, December 7, 2024
Homeआरोग्यकोरोनासातारा जिल्ह्यात ११२ हॉटस्पॉट ; सातारा, कराडमध्ये प्रशासन चिंतेत...

सातारा जिल्ह्यात ११२ हॉटस्पॉट ; सातारा, कराडमध्ये प्रशासन चिंतेत…

सातारा : सातारा जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यांत करोनाचा प्रादुर्भाव आणखीनच वाढला असून बाधितांचा आकडा एक लाखांच्यावर तर मृतांचा आकडा अडीच हजारांच्या घरात गेला आहे. गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यातील ११२ हॉटस्पॉटमध्ये सात हजार ७८६ बाधित आढळून आले आहेत. सातारा, फलटण, खटाव, कराड तालुक्‍यात अद्यापही धोका कायमच असून कोरेगाव, खंडाळा तालुक्‍यांमधील वाढती रुग्णसंख्या प्रशासनाची डोकेदुखी ठरणारी आहे. वाढत्या बाधित आणि मृत्यूंमुळे प्रशासनाची मात्र कसरत होत आहे.

सातारा तालुक्‍यात 13 हॉटस्पॉटमध्ये 1009 बाधित

सातारा शहर आणि तालुक्‍यात करोनाचा कहर सुरुच असून बाधित आणि मृत्यूमध्येही सातारा तालुक्‍याने आघाडी घेतली आहे. गेल्या पंधरा दिवसात सातारा तालुक्‍यातील मंगळवार पेठ 111, शनिवार पेठ 60, केसरकर पेठ 48, कुशी 106, गोडोली 147, शाहूनगर 75, सदरबझार 135, शाहूपुरी 91, नागठाणे 78, खेड 45, विकासनगर 28, मुंढेवाडी 41, सोनवडी 44 अशा 13 हॉटस्पॉटमध्ये एक हजार नऊ बाधित आढळले आहेत.

जानेवारी महिन्यापासून बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. या ११२ हॉटस्पॉटमध्ये तालुकानिहाय पुढील गावांचा समावेश आहे.

(रुग्णसंख्येचा आकडा दि. 15 ते 29 एप्रिल या कालावधीतील) खटाव तालुका : वडूज 170, एनकुळ 30, कातरखटाव 115, डांबेवाडी 18, बोंबाळे 71, भुरकवडी 42, पेडगाव 14, खटाव 116, नागाचे कुमठे 31, विसापूर 40, खातगुण 23, पुसेगाव 86, गारुडी 18, मायणी 79, राजापूर 37, बुध 75, वेटणे 48, काटेवाडी 32, भोसरे 35, खबालवाडी 100, औंध 91, रहाटणी 18.,

जावळी तालुका : सावली 18, मामुर्डी 31, मेढा 22, बिभवी 46, बोंडारवाडी 22, आंबेघर 34, केळघर 50, सरताळे 22, आलेवाडी 20, कुडाळ 53, हातेघर 24, दिवदेव 22.,

कोरेगाव तालुका : कोरेगाव 224, एकंबे 114, देऊर 41, पिंपोडे बुद्रुक 80, नांदवळ 21, वाठार स्टेशन 47, रहिमतपूर 150, कण्हेरखेड 27.,

वाई तालका : नागेवाडी 55, भुईंज 80, जांब 50, सोनगिरवाडी 20, रामडोह आळी 28, रविवार पेठ वाई 46, म्हातेकरवाडी 30, लोहारे 32, धावडी 19, बावधन 257, शेंदुरजणे 27, बोपेगाव 30, पसरणी 51., 

माण तालुका : म्हसवड 272, ढाकणी 28, पानवण 39, भालवडी 28, दहिवडी 165, राणंद 59, नरवणे 109, लोधावडे 54. 

खंडाळा तालुका : लोणंद 278, अंदोरी 91, कराडवाडी 20, विंग 33, शिरवळ 459, शिंदेवाडी 37, खंडाळा 54.

कराड तालुका : मलकापूर 54, कार्वे 95, कोरेगाव कराड 17, शेणोली 23, मसूर 34, सैदापूर 95, बनवडी 28, शनिवार पेठ 80, सोमवार पेठ 39, सुपने 58., 

पाटण तालुका : पाटण 59, ठोमसे 23, तारळे 105, बनपुरी 42., 

फलटण तालुका : तरडगाव 108, आलुगडेवाडी 33, विडणी 139, मिरढे 23, मुंजवडी 18, जाधववाडी 39, कोळकी 109, कसबा पेठ 32, मलठण 138, रविवार पेठ 45, लक्ष्मीनगर 120, 

महाबळेश्वर तालुका : भिलार 57, खिंगर 54, पाचगणी 130, हॉटेल ड्रिमलॅंड 20.

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात उच्चांकी बाधित आढळून येत आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढत असले तरी प्रशासन मृत्यूदर कमी करण्याबाबत आवश्‍यक पावले उचलत आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता करोना चाचणी वेळेत करावी. घरगुती उपचार करण्याची ही वेळ नसून करोनाची लक्षणे आढळल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घेवून तात्काळ करोनाची चाचणी करुन घ्यावी. लसीकरणाचीही मोहीम गतीने राबवण्यात येत असून प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन लसीकरणावेळी गर्दी टाळावी.

– डॉ. अनिरुध्द आठल्ये  (जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा)

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील व त्यांचे सहकारी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवत आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अविनाश फडतरे, मनोज ससे आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय