Sunday, May 5, 2024
Homeकृषीकिसान सभेची मका खरेदी केंंद्र सुरु करण्याची मागणी. वाचा सविस्तर

किसान सभेची मका खरेदी केंंद्र सुरु करण्याची मागणी. वाचा सविस्तर

जालना :  भोकरदन येथे मका खरेदी खरेदी सुरू करण्याच्या मागणीला अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

भोकरदन येथील मका खरेदी केंद्रावर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माल घेऊन या असा मेसेज शेतकऱ्यांना करून मका आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांची मका भिजून नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन खरेदी केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निदर्शने करण्यात आले.

शेतकऱ्यांना मका घेऊन येण्यासाठी खरेदी केंद्राकडून संदेश पाठवण्यात आले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रात मका आणली खरी, मात्र खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना मका मालवाहू गाडीसह तिथेच ठेवावी लागली. पावसामुळे ही मका भिजली असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शिवाय मालवाहू वाहनाचे १००० रुपये प्रतिदिन प्रतिवाहन अतिरिक्त भाड़याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. भरपाई द्यावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला असून मक्का खरेदी केंद्र त्वरित चालू करून नुकसान भरपाई द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे अनिल मिसाळ व बाजीराव फुके यांनी केले. या आंदोलनात अजित पंडित, गजानन गाढे, समाधान वाघ, सुरेश शिंदे, सोमनाथ सिरसाठ, दादाराव घायवट, विनोद फुके, भरत फुके, विशाल फुके  इत्यादि शेतकरी उपस्थित होते. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय