Friday, April 26, 2024
Homeआरोग्यकोरोना अपडेट:- जिल्ह्यात आज ३४१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,वाचा सविस्तर

कोरोना अपडेट:- जिल्ह्यात आज ३४१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,वाचा सविस्तर

औरंगाबाद :- जिल्ह्यात आज १५३ जणांना (मनपा १०६, ग्रामीण ४७) सुटी देण्यात आली. आजपर्यंत ११,५२१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण ३४१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५,४९१ झाली आहे. आजपर्यंत एकूण ५०० जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ३७४० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

दुपारनंतर २८० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ४८, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ७४ आणि ग्रामीण भागात १४५ रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे  (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण भागातील रुग्ण (१५२)

पिंपळवाडी, पैठण (१), पोलिस स्टेशन रोड, वैजापूर (१), नवगाव, पैठण (१), औरंगाबाद (३५), फुलंब्री (२), गंगापूर (३४), कन्नड (५), सिल्लोड (२८), वैजापूर (१४), पैठण (२७), ओमसाई नगर, रांजणगाव (१), दत्त नगर, वाळूज (१), यसगाव दिघी (१), गांधीनगर, रांजणगाव (१)

सिटी एंट्री पॉइंट (४८)

प्रताप नगर (१), बिडकीन (१), उत्तरानगरी (२), टीव्ही सेंटर (१), जय भवानी नगर (१), एन चार (१), बाला नगर, पैठण (१), चित्तेगाव (१), लासूर स्टेशन (२), करमाड (१), अंबिका नगर (१), कन्नड (१), पडेगाव (१), पदमपुरा (१), बिडकीन (१), पिंपरी राजा (१), सातारा परिसर (१), द्वारका नगर (१), शिवाजी नगर (१), भावसिंगपुरा (१), आंबे लोहळ (१), बजाज नगर (३), रांजणगाव (४), म्हारोळा (१), कांचनवाडी (१), एन चार (३), चिश्तीया कॉलनी (१), मिसारवाडी (१), नक्षत्रवाडी (१), जय भवानी नगर (२), गिरनेर तांडा (१), वानखेडे नगर (१), मयूर पार्क (१), ईटाळा (३), गजानन महाराज मंदिर जवळ (१) अन्य (१)

मनपा हद्दीतील रुग्ण (६)

कानिफनाथ कॉलनी, भावसिंगुपरा (१), बैद सावंगी (१), प्रगती कॉलनी (१), बेगमपुरा (१), शांतीपुरा (१), सिडको, एन अकरा (१)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत सिल्लोड तालुक्यातील अंभईमधील ७३ वर्षीय पुरूष , साजापुरातील ७१ वर्षीय  पुरूष आणि खासगी रुग्णालयात शहरातील क्रेसेंट सोसायटी, हडकोतील ६० वर्षीय स्त्री या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय