मोगा:फरार खलिस्थान समर्थक अमृतपाल सिंगला पंजाब पोलिसांनी मोगा गुरुद्वारात त्याच्या सहकाऱ्यांसह अटक करण्यात आली आहे.
अमृतपाल सिंग १८ मार्च पासून फरार होता.
अमृतपाल सिंग याला रोडे,मोगा येथे गुरुद्वारामध्ये प्रवचन दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.त्याला आसामच्या दिब्रुगड तुरुंगात हलवण्यात येणार आहे.
अमृतपाल सिंगवर देशविरोधी कृत्ये,पोलिसांवर हल्ले करणे इत्यादी आरोप आहेत.त्याची तातडीने पोलिसांनी आसामच्या दिब्रूगड येथील तुरुंगात रवानगी केली आहे.