Sunday, May 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC-घरपट्टी १८३९ रु उपयोग कर्ता शुल्क १२६० रु--मनपाची लूटमार सुरू

PCMC-घरपट्टी १८३९ रु उपयोग कर्ता शुल्क १२६० रु–मनपाची लूटमार सुरू

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.२३-पिंपरी चिंचवड महापालिकेने १२६० रु उपयोगकर्ता शुल्कासह मिळकत धारकास ऑनलाईन घरपट्टी भरण्याचे आदेश जारी केले आहेत.मनपाने घरपट्टी भरण्यासाठी एसएमएस मोबाईलवर पाठवून २०२३-२४ चा कर आगाऊ भरा,५ टक्के सवलत मिळवा,अशा सूचना मिळकतधारकास आल्या आहेत. पिंपरी चिंचवड मनपाने कचरा संकलनासाठी उपयोगकर्ता शुल्क वार्षिक ७२० रु व मागील २०१९-२० ची उपयोग कर्ता शुल्क थकबाकी ५४० रु मिळकत करात जमा केली आहे.

मिळकतकर धारक क्रांतिकुमार कडुलकर हे दरवर्षी १७०६ रु मिळकत कर भरत होते. मात्र या वर्षी ५ टक्के म्हणजे रु.११० इतकी सवलत देऊन त्यांना ३०४४ रु मिळकत कर भरावा लागणार आहे.पिंपरी चिंचवड मनपाने उपयोग कर्ता शुल्क लावून घरपट्टी दुप्पट केली आहे.प्रशासकीय सेवा शुल्क,सामान्यकर,वृक्षउपकर,मतप्रवाह सुविधा लाभकर,रस्ताकर,शिक्षणकर ई सर्व कर घरपट्टी मध्ये समाविष्ट असताना अधिकतम उपयोग कर्ता शुल्क लावून मनपा प्रशासन मिळकतकर धारक नागरिकांना लुटत आहे.

पिंपरी चिंचवड मनपा मध्ये प्रशासकीय राजवट आल्यापासुन मूलभूत सेवा न देता लोकांच्या कडून कर वसुल करण्यात वाढीव कर लादून प्रशासक नागरिकांना हैराण करत आहेत.विद्यमान आमदार,खासदार,पालकमंत्री मनपा आयुक्तांना जाब कधी विचारणार?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय