Saturday, December 2, 2023
Homeशहरदेश प्रेमाची भावना अखंडपणे तैवत ठेवा – कर्नल आर.डी.सिंग

देश प्रेमाची भावना अखंडपणे तैवत ठेवा – कर्नल आर.डी.सिंग

पिंपरी चिंचवड : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अमृतमहोत्सवी स्वातंत्र दिनानिमित्त सकाळी शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, पथसंचालन, मल्लखांब, तलवार बाजी, लाठी आदीचे प्रात्यक्षिके, देशभक्तीपर गीते विविध गुणदर्शन कार्यक्रम घेवून उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे कर्नल आर.डी.सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला. यावेळी ललित गुंन्देशा, संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, सचिव डॉ. दीपक शहा, तळेगावच्या माजी नगराध्यक्षा शशिकला शहा, शेवंती शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, डॉ. पोर्णिमा कदम, सविता ट्रॅव्हीस, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया, एम.बी.ए. चे संचालक डॉ.सचिन बोरगावे, उपप्राचार्य डॉ.क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्‍हाडे समवेत शिक्षक, शिक्षकेत्तर, कर्मचारी, पालक वर्ग उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा व सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून सन्मानपूर्वक करण्यात आले. यावेळी त्यांचा व मान्यवरांच्या हस्ते विशेष नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थी, प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कर्नल आर.डी.सिंग म्हणाले, प्रत्येकांच्या मनात देशप्रेम असते. आपापल्या क्षमतेने देशसेवा करीत असतात. आज विद्यार्थ्यांचे पथसंचलन, मल्लखांब, राष्ट्रभक्तीपर गीत, नृत्य आदी कार्यक्रम सादर केले. तेसुद्धा देशप्रेमाचे प्रतिक आहे. आज उपस्थित विद्यार्थ्यांमधील काहीजण उद्याचे सैनिक अधिकारी देखील असाल. तसेच, खेळ, ज्या ज्या क्षेत्राची आवड असेल त्या क्षेत्रात मेहनत, चिकाटीच्या जोरावर यश संपादन करा. स्वच्छ भारत अभियानात सहभागी होवून, घर, परिसर, शाळा, महाविद्यालयात स्वच्छता कशी कायम राहील. त्यासाठी सदैव दक्ष रहा.एकमेकांबद्दल सदभाव, आपुलकी, आदर बाळगा, लक्षात ठेवा शिकण्यामुळेच आपली प्रतिष्ठा वाढते. परिक्षेत किती टक्के गुण मिळाले यापेक्षा ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहात ते सर्वोत्तम आत्त्मसात करा. त्यातूनच तुम्ही उद्याचे आदर्श नागरिक व्हाल. कितीही मोठ्या पदावर गेलात तुम्ही शिकत असलेल्या शाळेशी नाते सोडू नका. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा प्रसंगात इतरांना मदतीची भावना सतत जागृत ठेवत कायमस्वरूपी एकमेकांत मिसळून रहा, असा संदेश यावेळी उपस्थितांना देत युद्धातील अनेक प्रासंगिक किस्से ऐकविले.

ललित गुन्देशा म्हणाले, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. देशातील संस्कृती, देशाबद्दल असलेला अभिमान कायमस्वरूपी जागृत ठेवा, असे आवाहन करून आज तुम्ही विद्यार्थी दशेत आहात. उद्या यशस्वी होवून सार्वजनिक मंचावर येत इतरांना मार्गदर्शन करा, देशाला तुमचा गर्व, हेवा वाटला पाहिजे, असे काम करा. पर्यावरणासाठी गोशाळा महत्वाची असून देशात 16 हजार गोशाळा आहेत. गोमातेचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दीपक शहा प्रास्ताविकात म्हणाले, आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करा. कर्तव्यापासून स्वतःला अलग न करता स्वतःमध्ये उत्साह, ताकद, आत्त्मविश्वास निर्माण करा. इतरांपेक्षा वेगळे काय करता येईल, याचा ध्यास अंगिकारत भारत देशाला महाशक्ती करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नाची परीकाष्ठा करा, देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या थोर व्यक्तिंनी बलिदान दिले. त्याचा आदर्श आत्मसात करावा, असे आवाहन केले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चिन्मया जैन, प्रा. सुरेखा कुंभार, प्रा. जस्मीन फराज यांनी केले. उपस्थित पाहुण्यांची परिचय प्रा. वैशाली देशपांडे,प्रा. सुकन्या बॅनर्जी यांनी केले तर आभार डॉ. पल्लवी चूग यांनी मानले.

– क्रांतिकुमार कडुलकर

Lic
संबंधित लेख

 


लोकप्रिय