Wednesday, June 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रुग्णालयात फळ वाटप

पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम आदमी पार्टी चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष यशवंत कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली आज संध्याकाळी ६ वाजता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव रुग्णालय येथे फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार घेणारे रुग्ण हे श्रमिक व सामान्य कुटुंबातील असतात अशा रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईक सुद्धा क्वचितच जातात. म्हणून सर्वसामान्य जनतेसाठी कल्याणकारी राज्य चालवणाऱ्या आपल्या लाडका नेता अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून थेरगाव रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप केल्याचे यशवंत कांबळे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला आप चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष यशवंत कांबळे, प्रचार प्रमुख संतोषी नायर, प्रचार प्रमुख शशिकांत कांबळे, प्रवक्ता संजय मोरे, युवा प्रमुख ओमीन गायकवाड, युवा सदस्य अजय सिंग आणि इतर सदस्य उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

---Advertisement---
Lic
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles