Friday, May 17, 2024
HomeराजकारणKarnataka Election : कर्नाटकमधील पराभवाने भाजपच्या 'मिशन 2024' ला धक्का

Karnataka Election : कर्नाटकमधील पराभवाने भाजपच्या ‘मिशन 2024’ ला धक्का

Karnataka Election 2023 Results : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी पासून सुरू होती. त्यामध्ये काँग्रेसने 131 जागांवर विजय मिळवत कर्नाटकातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचे सिद्ध केले आहे. तर भाजपने 66 जागांवर विजय तर जेडीएस ला 21 विजय मिळवला आहे. तर इतर पक्षांनी 6 जागावर विजयी झाले आहेत. मोदी – शहा यांच्या हिंदूत्वाच्या राजकारणाला कर्नाटकातील जनतेने झिडकारले असल्याचे दिसले.

एक्झिट पोलच्या निकालात भाजपचा पराभव आणि काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात होता. तो खरा ठरला आहे. पुढील वर्षी लोकसभेची निवडणुका पार पडणार आहे. त्यादृष्टीने कर्नाटक निवडणुकीला मोठं महत्त्व होते.

2024 मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या दृष्टिकोनातूनही कर्नाटकची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची होती. परंतु कर्नाटक निवडणूकीत भाजपाला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात काँग्रेसला यश आले. त्यामुळे कर्नाटक पराभवाने 2024 च्या निवडणुकीत ‘मिशन 400’ समोर अधिक आव्हाने निर्माण झाली आहेत.

तसेच भाजपाला दक्षिण भारतात शिरकाव करण्यासाठी अनुकूल असलेल्या कर्नाटक मध्ये मात्र भाजपाला विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे दक्षिण भारतात कर्नाटकातून पाय रोवण्यास भाजपाला धक्का दिला आहे.

कर्नाटकामधील जागा घटण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवामुळे लोकसभेतील जागा घटण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये कर्नाटकमधील 28 पैकी 25 जागांवर भाजपला विजय मिळाला होता. तर, एका जागेवर भाजपने पाठिंबा दिलेला उमेदवार विजयी झाला होता. काँग्रेस-जेडीएस ने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला.

पाच राज्यात 172 जागा

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी 18, महाराष्ट्रात 48 पैकी 23, कर्नाटकात 28 पैकी 25, बिहारमध्ये 40 पैकी 17, झारखंडमध्ये 14 पैकी 12 जागा जिंकल्या. या पाच राज्यातील 172 जागांपैकी भाजपने 98 जागांवर विजय मिळवला होता. तर, मित्र पक्षांनी 42 जागांवर विजय मिळवला. या पाच राज्यात 172 पैकी 140 जागांवर भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएने विजय मिळवला होता.

मित्रपक्ष गमावल्यामुळे समीकरण बिघडणार

लोकसभेच्या 48 जागा असणाऱ्या महाराष्ट्रात आणि 40 जागा असणाऱ्या बिहारमध्ये भाजपाने मित्रपक्ष गमावल्यामुळे अधिक आव्हाने निर्माण झाली आहेत. महाविकास आघाडीमुळे भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर, बिहारमध्ये नितीशकुमार हे महाआघाडीत आल्याने आता भाजपसमोर अधिक आव्हान निर्माण झाले आहे. पश्चिम बंगालमध्येही 2019 मधील कामगिरीची पुनरावृत्ती करणे भाजपसाठी कठीण दिसत आहे.

दक्षिण भारतात भाजप अयशस्वी

केरळ, आंध्रप्रदेश, पाँडिचेरी, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये भाजपला मोठं यश मिळालं नाही. दक्षिणेकडील सहा राज्यांमध्ये लोकसभेच्या 130 जागा आहेत. एकूण लोकसभेच्या जागांपैकी सुमारे 25 टक्के आहेत. अशा परिस्थितीत दक्षिण भारत राजकीयदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे. 2019 मध्ये, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये भाजपला जागा मिळाल्या, परंतु उर्वरित दक्षिणेकडील राज्यांमध्ये जागा मिळाल्या नाहीत. कर्नाटकच्या माध्यमातून भाजपला दक्षिणेत पाय पसरवायचे आहेत, मात्र कर्नाटक निवडणूकीने हा एक धक्का दिला आहे.

(आकडेवारी सतत अपडेट होत आहे.)

हे ही वाचा :

कर्नाटकात भाजप की काँग्रेस ? ‘जेडीए’ किंगमेकर ठरणार

कर्नाटक निवडणूक निकाल : काँग्रेस आघाडीवर तर भाजप पिछाडीवर; तर बेळगावात…

जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध करत माकप कडून कडवी टिका

बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

हिमोफीलिया सोसायटी ऑफ पुणे कडून जागतिक परिचारिका दिन साजरा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय