Friday, November 22, 2024
Homeग्रामीणकळसूबाई अभयारण्य पर्यटकांसाठी खुले, काजव्यांचा निसर्गाविष्कार यावर्षी पाहता येणार !

कळसूबाई अभयारण्य पर्यटकांसाठी खुले, काजव्यांचा निसर्गाविष्कार यावर्षी पाहता येणार !

सुशिलकुमार चिखले यांची माहिती

राजूर (अकोले) : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने वन विभागाने पर्यटकांना भंडारदरा, कळसुबाई अभयारण्यात कोरोना नियमांचे पालन करत मंगळवार (८ जून) पासून पर्यटकांसाठी खुले केले आहे. 

त्यामुळे २५ जुलैपर्यंत पर्यटकांना लखलखणारे काजवे पाहण्याची संधी तब्बल दोन वर्षांनी मिळणार आहे. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिक आदिवासींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

मोजक्याच पर्यटकांना प्रवेश : 

वन्यजीव विभागाने भंडारदरा-कळसुबाई अभयारण्यात एका वेळी मोजक्याच पर्यटकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक स्पॉटवर एका वेळी २५ पर्यटकांना प्रवेश देण्यात येईल. 

अभयारण्यात प्रवेश करण्यापूर्वी पर्यटकांचे थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे. कोरोना नसलेल्या पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. 

नियम न पाळल्यास कारवाई : 

विशेष म्हणजे, पर्यटकांना अभयारण्यात सुरक्षित अंतराचे पालन करत मास्क व सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास पर्यटकांना प्रवेश बंदी केली जाईल, असे वन विभागाचे ACF गणेश रणदिवे यांनी सांगतले.


संबंधित लेख

लोकप्रिय