जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील घाटघर येथील तरुणांनी सांभराच्या पिल्लाला जीवदान दिले.
सविस्तर वृत्त असे की, काल (दि. १५ मे) सायंकाळी ५ च्या सुमारास घाटघर गावाशेजारील तळ्यात सांबराचे पिल्लू पडले असल्याचे काही तरुणांनी पाहिले. तरुणांनी ताबडतोब या बाबतची माहिती वनपाल व वनरक्षक यांना दिली. तसेच सांभराच्या पिल्लाला तळ्यातून बाहेर काढले.
प्रत्यक्ष पाहणीनंतर सांभरावर भटक्या कुत्र्यांंनी हल्ला केल्याचे निदर्शनास आले. त्याठिकाणी वनविभागाचे मारुती साबळे यांनी सांभरावर झालेल्या जखमांवर प्राथमिक उपचार केले.
यावेळी विशाल रावते, सचिन घोयरत, विलास रावते, सौरभ रावते, विष्णू रावते, किरण असवले, शिवाजी लोखंडे, राजू रावते व सुनील साबळे या ग्रामस्थांच्या मदतीने सांंभराला पुन्हा सुखरूपपणे जंगलात सोडण्यात आले.