जुन्नर / प्रा.सतिश शिंदे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बेलसर ते भिवाडे दरम्यानच्या आमलेवाडी, दत्तमंदिर, बोतार्डे, राळेगण, शिंदे तसेच घंगाळदरे या ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यातील धुळ व खडी अस्ताव्यस्त पडल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या गोष्टीकडे सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
मागील तीन महिन्यापूर्वी या रस्त्याचे खड्डे तात्पुरती डागडुजी करून भरले होते. मात्र येथील परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाल्याने या भागातील नागरीक या कामाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. रस्त्यावरील धुळीने वाहनचालक व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराने घेतले आहे त्यांनी रस्त्याला वरवरची मलमपट्टी केल्याने रस्ता पुन्हा खड्डेमय व धुळमय झाला असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
या रस्त्याच्या साईडपट्टयांची तर पुरती दुर्दशा झालेली असून साईडपट्ट्यांना मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे व गवत वाढल्याने गटारे देखील बदं झाली आहेत. यामुळे पावसाळ्यात सदर रस्त्याच्या कडेच्या गटारातील पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यांना मोठे खड्डे पडतात याकडे सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.
या ठिकाणावरून भिवाडे, सुकाळवेढे, हिवरे पठार, आंबे, हातवीज, इंगळूण या गावांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. सदर रस्त्याचे खड्डे प्रशासनाने तत्काळ बुजविण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे.
हे ही वाचा :
जुन्नर : बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणी एकास अटक तर २० जणांवर गुन्हा दाखल
जुन्नरच्या पेशवेकालीन शाहीर समाधी मंदिरातील “पदचिन्ह” दुर्लक्षित
कादरीया वेलफेअर सोसायटी तर्फे सामुदायिक विवाह संपन्न
धक्कादायक : शौचालयाचा टँक साफ करताना एकाच घरातील पाच कामगारांचा गुदमुरून मृत्यू
४१℃ : पिंपरी चिंचवड, पुणे सह विविध शहरे का तापत आहेत ?
वारणा महाविद्यालयात निरोगी आरोग्य आणि वृध्दत्व या विषयावर व्याख्यान