Saturday, May 18, 2024
Homeग्रामीण'कुकडीचे पाणी' चे दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा संपन्न

‘कुकडीचे पाणी’ चे दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा संपन्न

जुन्नर : ज्येष्ठ कादंबरीकार, शिवनेरीभूषण द. स. काकडे यांच्या ‘कुकडीचे पाणी’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा दि. १० मे रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमीत संपन्न झाला.

या समारंभातच मराठी बाणा फेम शिवनेरीभूषण अशोक हांडे यांच्या शुभहस्ते आणि साहित्यिक, निवृत्त अधिकारी धनराज वंजारी, शिवांजली साहित्यपीठ प्रवर्तक शिवाजीराव चाळक, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव जाधव, स्तंभलेखक संजय नलावडे, समाजसेविका सुनीताताई शिंदे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दिपलक्ष्मी तांबे यांच्या ‘मी आणि माझ्या कविता’ या पहिल्या काव्यसंग्रहाचेही याप्रसंगी प्रकाशन करण्यात आले.

मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने सुरू झालेल्या समारंभाचे द.स.काकडे यांचा नातु समय तांबे याने मार्मिक प्रास्ताविक केले तर द.स.काकडे यांनी मान्यवरांना शाल, श्रीफळ आणि कुकडीचे पाणी या पुस्तकाचे मुखपृष्ठ असलेले आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले.

उदित पाटील यांनी ‘कुकडीचे पाणी’ या आत्मचरित्रातील एका ह्रदयस्पर्शी भागाचे आपल्या धीरगंभीर आवाजात असे काही अभिवाचन केले की सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले. आकाशवाणी निवेदिका पूर्णिमा शिंदे यांनी शब्द आणि पुस्तकं आपल्याला समृद्ध करतात असे म्हटले तर धनराज वंजारी यांनी मराठी, हिंदी, उर्दू भाषेतून आपल्या पोलीस सेवेतील अनुभव आणि दसकाकडे यांचा साधेपणा सांगितला.

स्तंभलेखक संजय नलावडे यांनी दसकाकडे यांच्या खडतर जीवनातील यशस्वी साहित्यिक प्रवास आणि कुकडीचे पाणी पुस्तकावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. समाजसेविका सुनीताताई शिंदे यांनी दसकाकडे यांच्या आयुष्यात गेल्या पन्नास वर्षांतील घडलेल्या घटनांची साक्षीदार असल्याचे सांगितले. मराठी बाणाकार अशोक हांडे यांनी गौरवोद्गार काढताना द.स.काकडेंनी ग्रामीण संस्कृतीतील दाहक अनुभव, भाऊबंदकीतील भांडणतंटे, कौटुंबिक संघर्ष आपल्या साहित्यातून पोटतिडकीने आणि प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला असे सांगितलेच पण जुन्नरचं सांस्कृतिक वेगळेपण, गावागावाची विविध समृद्धी आणि श्रीमंती अनेक उदाहरणांसह अधोरेखित केली.

द.स.काकडे यांनी आपल्या मनोगतात स्वतःच्या एकूणच साहित्यिक प्रवासाबद्दल कृतार्थता व्यक्त केली आणि आपल्या यशाचे श्रेय आपल्यावर प्रेम करणाऱ्या हजारो वाचकांना बहाल केले. कांचन पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले तर सौरभ सोहनी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

हे ही वाचा :

जुन्नर : बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणी एकास अटक तर २० जणांवर गुन्हा दाखल

जुन्नरच्या पेशवेकालीन शाहीर समाधी मंदिरातील “पदचिन्ह” दुर्लक्षित

कादरीया वेलफेअर सोसायटी तर्फे सामुदायिक विवाह संपन्न

धक्कादायक : शौचालयाचा टँक साफ करताना एकाच घरातील पाच कामगारांचा गुदमुरून मृत्यू

४१℃ : पिंपरी चिंचवड, पुणे सह विविध शहरे का तापत आहेत ?

वारणा महाविद्यालयात निरोगी आरोग्य आणि वृध्दत्व या विषयावर व्याख्यान

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय