Thursday, November 21, 2024
Homeजुन्नरJunnar : गणपती उत्सवाच्या पार्श्वभुमीवर जुन्नर पोलीस स्टेशनतर्फे शांतता कमिटीची बैठक संपन्न

Junnar : गणपती उत्सवाच्या पार्श्वभुमीवर जुन्नर पोलीस स्टेशनतर्फे शांतता कमिटीची बैठक संपन्न

Junnar (रफिक शेख) : जुन्नर पोलीस स्टेशनने गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जुन्नर शहरातील सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष हजर होते. पोलीस निरीक्षक (पी.आय.) अवचर यांनी सर्व गणपती मंडळांना मार्गदर्शन केले आणि गणपती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

पी.आय. अवचर यांनी गणपती मंडळांना डीजेचा वापर टाळण्याची विनंती केली आणि गणपती बसवण्याच्या ठिकाणी भक्ती गीते लावावी असेही आवाहन केले. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व गणपती मंडळांनी पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधावा, असेही त्यांनी सुचवले. (Junnar)

पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार (Junnar)

या बैठकीच्या निमित्ताने जुन्नर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी ए.पी.आय. पवार यांची बदली खेड येथे झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, नवीन अधिकारी ए.पी.आय. मोरे आणि शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. पोलिस अधिकारी बकरे यांचे प्रमोशन झाल्याबद्दलही त्यांचा सत्कार करण्यात आला.

गणपती उत्सवाच्या काळात जुन्नर शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आणि गणपती मंडळांनी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

संबंधित लेख

लोकप्रिय