जुन्नर / राहुल मते : हडसर गावातील कोटमवाडी येथील शेतकरी देवराम गवारी यांच्या शेळ्यांच्या कळपावर सायंकाळी चार च्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. यात एक बोकड जागीच ठार झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे.
या अगोदर एक महिन्यापूर्वी शेतकरी गोविंद शेळके यांच्या शेळ्यांवर हल्ला केला होता. मात्र, दोन दिवसांनी शेळी मरण पावली, अशीही माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
शेळ्यांवर वाढत्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई वन विभागाकडून मिळावी. तसेच बिबट्याला जेरबंद करण्यात यावे, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.