Friday, May 17, 2024
Homeग्रामीणजुन्नर : वनरक्षक रमेश खरमाळे यांची चौकशी करुन कायदेशीरित्या योग्य कारवाई करा...

जुन्नर : वनरक्षक रमेश खरमाळे यांची चौकशी करुन कायदेशीरित्या योग्य कारवाई करा – बिरसा ब्रिगेड

जुन्नर (पुणे) : वनरक्षक रमेश खरमाळे यांची चौकशी करुन कायदेशीरित्या योग्य कारवाई करा, अशी मागणी बिरसा ब्रिगेड (सह्याद्री) च्या वतीने तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, किल्ले शिवनेरीवरील तोफगोळे वादाच्या भोवऱ्यात, या मथळयातील सामाजीक कार्यकर्ते मिलिंद मडके यांनी वनविभागास दिलेले निवेदन पाहता किल्ले शिवनेरी वरील तोफगोळे 3 तारखेस सापडले परंतु सदर वेळेस कोणतेही खोदकाम नसताना अचानक कसे सापडले ? किल्ल्यावरील काम हे फेब्रुवारी महिन्यात चालू होते. मात्र आता अचानक तोफगोळे सापडणे. तसेच खरमाळे हे शिवनेरी किल्ल्याचे इनचार्ज नसताना तेथून तोफगोळे आणणे बाबत त्यांना प्रशासनाचे आदेश होते काय ? याची चौकशी व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

तसेच शिवनेरी किल्ल्यांवरील जे वनमजूर आहेत त्यांना तोफगोळे आणताना का सांगितले गेले नाही. पंचनामा का झाला नाही. तोफगोळे पाच होते की तीन याची सखोल चौकशी व्हावी. तसेच जुन्नर तालुक्यातील किल्ले हे आदिवासी क्षेत्रात येतात. इथे 244 कायदा लागू आहे 1996 चा पेसा कायदा लागू आहे. येथील आदिवासी पारंपारिक ग्रामसभेची परवानगी शिवाय काहीही करता येत नाही. मात्र किल्ले चावंड, निमगिरी, हडसर या ठिकाणी कोणतीही ग्रामसभेची परवानगी न घेता यांनी साफसफाईच्या नावाखाली विनापरवानगी उत्खनन करुन ऐतिहासिक ठेवा हडप करण्याचे काम चालू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच पुरातत्व विभाग याकडे कानाडोळा करत आहेत. तरीही रमेश खरमाळे वनरक्षक यांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी अध्यक्ष मंगेश आढारी, सचिव आकाश लांघी, पंचायत समिती सदस्य काळू गागरे, निलेश शिंदे यांनी केली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय