Friday, November 22, 2024
Homeजुन्नरजुन्नर : महिला मंडळाच्या गणेशाचे धुमधडाक्यात विसर्जन

जुन्नर : महिला मंडळाच्या गणेशाचे धुमधडाक्यात विसर्जन

जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर येथील महिलांनी स्थापन केलेल्या पहिल्या गणेश मंडळाच्या गणपतीचे महिलांकडून भव्य मिरवणुकीत विसर्जन करण्यात आले.

जुन्नर शहरात नव्हे तर तालुक्यात जिल्ह्यात राजमाता जिजाऊ महिला विकास मंचाने बसविलेल्या गणपतीची चर्चा चालू आहे. गणपती बसविण्या पासून विसर्जनापर्यंत आरती पासून पूजा सांगण्यापर्यंत सर्व कामे महिलांनी पार पाडले आणि तीही यशस्वीरित्या त्याचबरोबर गणपती निमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

यामध्ये होम मिनिस्टर, वहिनीसाहेब, संगीत खुर्ची, अंताक्षरी, अन्नकोट स्पर्धा, अथर्वशीर्ष पठण, माजी सैनिकांचा सत्कार इत्यादी कर्नल रोनित रॉय यांचे मार्गदर्शन व चांगल्या प्रकारची माहिती महिलांना मिळाली विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीत ट्रॅक्टर चालविण्यापासून ढोल ताशा पथके लेझीम पथके सर्वकाही महिलांचेच होते. विसर्जनाच्या दिवशीची पूजा जुन्नर तालुक्याचे डी. वाय. एस. पी. मंदार जावळे व पीआय विकास जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. विसर्जनाची मिरवणूक पाच तास चालली. या मिरवणुकीत शहरातील बहुतेक स्त्रिया पारंपारिक वेशभूषा करून सहभागी झाल्या होत्या.

संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी अलकाताई फुलपगार, ज्योती चोरडिया, राखी शहा, पूजा बुट्टे, राजश्री कांबळे, सुरेखा जडर, नयना राजगुरू, राणी लुंकड, मंगल शिंदे, स्वाती पवार, रूपाली शहा, सरिता डोके, गीतांजली डोके, चारुशीला धायवट, जोशना महापरे, वैशाली भालेकर, अनुराधा गरिब, संगीता बेळे, श्वेता पवार, अर्चना पवार, पुनम नरोटे, सोनाली लोखंडे, रत्ना घोडेकर, मंजू चव्हाण, वैष्णवी पांडे, नेहा गाजरे, केतकी देठे, स्वाती डोंगरे, विद्यामिर गुंडे, नंदा कानडे, साधना फुलपागार, विजय डोके, भूमीषा खत्री, अलका वाकचौरे, अंजली कपूर, जयश्री जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित लेख

लोकप्रिय