Sunday, May 19, 2024
Homeजुन्नरजुन्नर शहरात विसर्जन मिरवणुकीची रात्री १२ वाजता सांगता

जुन्नर शहरात विसर्जन मिरवणुकीची रात्री १२ वाजता सांगता

जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर शहरात सकाळी १२ वाजता सुरु झालेल्या विसर्जन मिरवणुकीची रात्री १२ वाजता सांगता झाली. मुख्य विसर्जन मिरवणुकीत १४ नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी झाली होती.

रविवार पेठेच्या मानाच्या पहिल्या गणपतीची आमदार अतुल बेनके, माजी नगराध्यक्ष शाम पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, सुनील मेहेर, बाबा परदेशी, माजी नगरसेवक नरेंद्र तांबोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्षा आरती ढोबळे, भुषण ताथेड, मंडळाचे अध्यक्ष मंदार ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामदैवत श्री सिध्दीविनायक मंदिरापासून मिरवणुकिस जल्लोषात प्रारंभ झाला.

यंदा १२७ वे वर्ष साजरे करणाऱ्या सिद्धिविनायक रविवार पेठ मंडळाची गणेशमूर्ती आकर्षक पुष्परथात विराजमान झाली होती. तर ब्राम्हण बुधवार पेठ मंडळाचा गणेशमूर्ती फुलांनी सजविलेल्या मयुररथात विराजमान झाली होती. क्रांती सराई पेठ मंडळाची गणेशमूर्ती फुलाच्या गजथात विराजमान झाली होती. सदाबाजारमधील छत्रपती गणेशोत्सव, पणसुंबा पेठ, शंकरपुरा मंडळ, भाई कोतवाल मंडळ, तेली बुधवार पेठ, वरली आळी, जगदंबा भोई आळी, हुतात्मा भाई कोतवाल चौक, लोणार आळी, खालचा माळीवाडा, परदेशपूरा नेहरुबाजार मंडळाने फुलांचे डेकोरेशन व विद्युत रोषणाई केली होती.

जुन्नर नगरपरिषद कार्यालया समोरील चौकात मिरवणूकीचे आगमन झाल्यानंतर नगरपालिकेच्या वतीने प्रांताधिकारी सारंग कोडलकर, तहसिलदार रविंद्र सबनीस यांच्या हस्ते मंडळाचे स्वागत करण्यात आले. पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय