Sunday, December 8, 2024
Homeराष्ट्रीयधक्कादायक : मंदिरातील ताटातील बदाम खाल्ल्याने दलित अल्पवयीन मुलाला बाधून बेदम मारहाण

धक्कादायक : मंदिरातील ताटातील बदाम खाल्ल्याने दलित अल्पवयीन मुलाला बाधून बेदम मारहाण

सागर : मध्य प्रदेशातील सागर येथील एका जैन मंदिरात एका अल्पवयीन मुलाने घुसून मंदिरात ठेवलेल्या ताटातील बदाम खालल्याने या मुलाला बाधून जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

सागरमधील छोटा करिला येथे असलेल्या जैन मंदिरात एका अल्पवयीन दलित मुलाने प्रवेश केला. मंदिरात एका ताटात बदाम ठेवले होते, ते त्याने उचलले. यानंतर मुलाला मंदिरात बांधून बेदम मारहाण केली. मुलाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसत आहेत. या प्रकरणी अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन व्यक्तींनी एका मुलाला पकडून ठेवलेले दिसत आहे. हातात दोरी बांधून बेदम मारहाण करत आहेत. लहान मुलगा जोरात ओरडत आहे आणि शेजारी उभ्या असलेल्या लोकांना वाचवण्याची विनंती करत आहे.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मोती नगर पुलिस ठाण्याच्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. मारहाण करणाऱ्या जैन साधूशी चर्चा केली असता, मुलाला चोरीच्या संशयावरून पकडण्यात आल्याचे सांगण्यात आले. तो पळून जाऊ नये म्हणून त्याला बांधण्यात आल्याचे साधूने सांगितले.

या प्रकरणी मुलाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, तो मंदिराच्या गेटजवळ होता आणि चुकून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर संतापलेल्या जैन संताने मुलाला दोरीने बांधून बेदम मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तर या प्रकरणावर पोलिस अधिकारी म्हणाले, ‘गेटजवळ एक अल्पवयीन मुलगा उभा होता. तेथे उपस्थित राकेश जैन नावाच्या व्यक्तीने मुलाशी गैरवर्तन करून त्याला मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधीचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय