Friday, May 17, 2024
Homeजुन्नरजुन्नर : आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने टँकर व्यावसायिकाकडे मागितली 5 हजारांची लाच; गुन्हा दाखल

जुन्नर : आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने टँकर व्यावसायिकाकडे मागितली 5 हजारांची लाच; गुन्हा दाखल

जुन्नर : आश्रमशाळेस टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकाकडे पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जुन्नरमधील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला.

अरुण दगडू महाकाळ (वय ५७, रा. जुन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. याबाबत एका टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

दगडू महाकाळ हे मुथाळने येथील शासकीय आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आहेत. शासकीय आश्रमशाळेस टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी पुरवठ्याचे बिल मंजूर केल्याने महाकाळ यांनी टँकर व्यावसायिकाकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर टँकर व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

महाकाळ यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या विरुद्ध ओतूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक वीरनाथ माने यांनी ही कारवाई केली.

हे ही वाचा :

जुन्नर : भरदिवसा आठवडे बाजारात तरूणीवर चाकूने भ्याड हल्ला, मदतीला आलेल्या महिलेवरही वार

“महाराष्ट्र पोलीस देशात अग्रेसर” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा वाद; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

IIIT : नागपूर येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय