Friday, April 26, 2024
Homeजुन्नरजुन्नर : आदिवासी शासकिय वसतिगृहातील मुलींची शिवनेरी मसाले व्यवसायाला भेट, व्यवसायिक पैलू...

जुन्नर : आदिवासी शासकिय वसतिगृहातील मुलींची शिवनेरी मसाले व्यवसायाला भेट, व्यवसायिक पैलू घेतला जाणून

जुन्नर : आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर येथील विद्यार्थिनींनी शिवनेरी मसाले या उद्योग समूहाला भेट दिली. उद्योजिका स्वाती कबाडी यांनी भाजीपाला विक्रीतून सुरू केलेला व्यवसाय, आज शिवनेरी मसाले नावाने नावा रूपाला आलेला आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशात देखील त्यांच्या मसाल्याला आज मागणी आहे.

उद्योजिका स्वाती कबाडी यांनी मसाले व्यावसायासोबतच पोल्ट्री व्यवसाय देखील उभा केला आहे. विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी एक व्यावसायिक कसा असावा याविषयी त्यांचे अनुभव विद्यार्थिनींनी समोर मांडले. यावेळी वसतिगृहाच्या गृहपाल अर्चना पवार या उपस्थित होत्या.

कबाडी म्हणाल्या कि, कुटुंबातील सर्वच व्यक्ती या व्यवसायात आपल्या परीने हातभार लावत असतात. आम्ही आता केवळ मसालेच बनवत नाहीत तर प्रशिक्षक म्हणून देखील वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे.

यावेळी गृहपाल अर्चना पवार म्हणाल्या कि, कबाडी यांचे हे मार्गदर्शन विद्यार्थिनींना भविष्यात प्रेरणा देणारे ठरणार आहे. त्यांची माणसं जोडून ठेवण्याची कला आणि सेवा पुरवण्याची तळमळ आपल्याला खूप काही शिकवून जाते आजची भेट म्हणजे वसतिगृहातील विद्यार्थिनींनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं एक मोठं स्वप्न कसं साकार होतं याचं प्रत्यक्ष दर्शनच होतं, असं त्या म्हणाल्या.

Lic
जाहिरात 1
LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय