Saturday, April 20, 2024
HomeNewsआशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी – नितीन गडकरींना...

आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी – नितीन गडकरींना दिले निवेदन

सीआयटीयू तर्फे आंगनवाड़ी व आशा कर्मचाऱ्यांचे बालदिवासा निमित्ताने नितीन गडकरींना निवेदन

नागपूर
: अंगणवाडी फेडरेशनच्या आवाहना नुसार आज 14 नवंबर बाल दिवसानिमित्त केंद्रीयमंत्री मां.नितिन गडकरी यांना आंगनवाड़ी तसेच आशा कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्याकर्ता निवेदन देण्यात आले. त्यांचे अनुपस्थितीमुळे सचिवांनी निवेदन स्वीकार केले.

जवाब दो या पार्श्वभूमिकेवर भजन नही – भोजन दो संबंधित मागण्याचे स्लोगन घेऊन नारे – निदर्शने केली. मानधनात भरीव वाढ करण्यात यावी, ग्रैजुएटिचा प्रश्न लवकर निकली लावण्यात यावा, महिन्याची पेंशन लागू करावी, पोषण ट्रैकर जो पर्यंत स्थानीय भाषेत आणी सदोश ॲप येत नाही तेव्हा पर्यंत शासनानी कोर्ट च्या आदेशाची अवहेलना न करता जबरदस्ती करू नये, आशा वर्कर्स व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, सर्व कर्मचाऱ्यांना आत्मसन्मान मिळाला पाहिजे, ई पी एफ / ई एस आय लागू करा. अशा विविध मागण्यास घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेशी चर्चा करून मान्यता मिळवून द्यावी. असे पत्र नितीन गडकरी यांना सुपूर्द करण्यात आले.



निवेदन देताना अंगणवाडी राज्य महासचिव चंदा मेंढे, कार्याध्यक्ष विठ्ठल जूनघरे, अध्यक्ष शशि काळे, कोषाध्यक्ष प्रीति पराते, सीटू महासचिव दिलीप देशपांडे, आशा युनियन अध्यक्ष राजेंद्र साठे, महासचिव प्रीती मेश्राम, माधुरी जामगड़े, मीना पाटिल, चंदा वासनिक, स्मिता बोरकर, लता साथोने, लीला यूईके, मीनाक्षी फुलझलें, गीता बागड़े, किरण गणवीर उपस्थित होत्या.

Lic
जाहिरात 1
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय