Saturday, April 27, 2024
Homeग्रामीणजुन्नर : धामणखेल येथे दिव्यांगांचे मोफत साहित्य वाटप नोंदणी मोहिम संपन्न

जुन्नर : धामणखेल येथे दिव्यांगांचे मोफत साहित्य वाटप नोंदणी मोहिम संपन्न

जुन्नर : आज दि.23 नोव्हेंबर 2021 रोजी धामणखेल ग्रामपंचायत व प्रहार रूग्ण सेवक जुन्नर तालुका व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र जुन्नर यांच्या संयुक्त  विद्यमाने धामणखेल ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दिव्यांग (अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर, इ. ) व जेष्ठ नागरीक वय 60 च्या पुढे लोकांना मोफत साहित्य वाटप ची नाव नोदणी करून घेण्यात आली.

भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद पुणे यांचे वतीने आपल्या गावातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी व दिव्यांग बांधवासाठी कृत्रिम अवयव व सहाय्यक साधने मोफत उपलब्ध करून देण्यासाठी “पुर्व तपासणी नोंदणी शिबिर” आयोजित करण्यात आले होते. यावेळी 70 लोकांनी नाव नोदणी करून घेतली.

यावेळी ग्रामपंचायत धामणखेलचे सरपंच  संतोष जाधव, उपसरपंच देवराम कोंडे,   ग्रामसेवक वायकर, सदस्य अभिषेक वर्पे,   हेमांगी वर्पे, नेहा गुंजाळ, साधना कोंडे, पूजा मडके, गणेश  रघतवान, प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अध्यक्ष अरूण शेरकर, उपाध्यक्ष राहुल मुसळे, सौरभ मातेले, भरत कोंडे, व दिव्यांग बांधव व जेष्ठ नागरीक कार्यकर्ते उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय