जुन्नर / आनंद कांबळे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव सहाणी येथे विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप माजी विद्यार्थी संघटना वडगाव सहानी यांच्या सौजन्याने करण्यात आले. (Junnar)
यामध्ये थ्री इन वन वह्या, सुलेखन वह्या, चित्रकला वह्या, रंगभरण वह्या, झटपट वाचन लेखन उजळणी पुस्तक, शिसपेन्सिल, खोड रबर, शार्पनर, स्टील पट्टया, अंगणवाडी विद्यार्थ्यांसाठी पाटी, पेन्सिल, सुलेखन वही, रंगभरण वही इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. (Junnar)
याप्रसंगी शिक्षण विस्ताराधिकारी विष्णू धोंडगेे, गुंजाळवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख अरुणा बो-हाडे, गावचे सरपंच अविनाश वाबळे, माजी सरपंच वैशालीताई तांबोळी, चेअरमन हंबीर भिकाजी वाबळे, माजी विद्यार्थी संघटनेचे विजय गोविंद तांबोळी, माजी सरपंच गजानन हरिभाऊ तांबोळी, दादाभाऊ तांबोळी, बाबाजी वाबळे, सुनील शिंदे अध्यक्ष वडगाव सहानी युवा फाउंडेशन, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल ज्ञानेश्वर तांबोळी, उपाध्यक्ष कल्याणी वाबळे, मंगेश वाबळे, नारायण तांबोळी, गणेश तांबोळी समीर तांबोळी, संतोष नरहरी वाबळे, महेंद्र तांबोळी, विनोद तांबोळी, अंगणवाडी सेविका निता वाबळे व मदतनीस स्वाती तांबोळी इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रप्रमुख बो-हाडे यांनी सर्व ग्रामस्थांचे शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल कौतुक केले. गजानन हरिभाऊ तांबोळी यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस देण्याचे जाहीर केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल तांबोळी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक राजेंद्र बेलवटे यांनी केले व उपशिक्षक बाळासाहेब बांबळे यांनी आभार मानले. (Junnar)
हेही वाचा :
ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला
मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?
Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार
ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर
मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास
भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !
मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले
वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी