Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणआंबे पिंपरवाडी ग्रामपंचायत येथील ५३ लाभार्थ्यांना शोष खड्डे मंजूर

आंबे पिंपरवाडी ग्रामपंचायत येथील ५३ लाभार्थ्यांना शोष खड्डे मंजूर

 (प्रतिनिधी):-  महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेत शोष खड्डे खोदण्याच्या कामास पंचायत समिती जुन्नरकडून मंजुरी मिळाली आहे. 

             आंबे पिंपरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत एकूण ६० ते ६५ व्यक्तींनी या योजनेस अर्ज केले होते त्याची छाननी पंचायत समितीच्या मनरेगाअंतर्गत तांत्रिक अधिकाऱ्यांनी केली असता त्यातील ५३ व्यक्तींच्या मागणीस मंजुरी मिळाली असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, यासाठी आंबे पिंपरवाडी गावाचे सरपंच मुकुंद घोडे, ग्रामरोजगार सेवक संदीप शेळकंदे व DYFI चे गणपत घोडे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे त्यास यश मिळाले आहे.

         शोष खड्डे खोदण्याचे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत करावयाचे असल्यामुळे ज्या लाभार्थ्यांना शोष खड्डे मंजूर झाले आहेत त्यांनी आपल्या आंबे पिंपरवाडी गावचे सरपंच मुकुंद घोडे व ग्रामरोजगार सेवक संदीप शेळकंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय