Friday, November 22, 2024
Homeजुन्नरJunnar : बिबट्याच्या हल्ल्यात 9 शेळ्यांचा मृत्यू

Junnar : बिबट्याच्या हल्ल्यात 9 शेळ्यांचा मृत्यू

Junnar : हिवरे खुर्द (ता.जुन्नर) येथील प्रमोद येंधे या शेतकऱ्याच्या 9 शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या आहेत. यामध्ये 1 शेळी बिबट्या गोठ्यातून घेऊन पोबारा केला.

ही घटना शुक्रवारी (दि.29) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. बिबट्याने लोखंडी तारेची जाळी तोडून आत प्रवेश करून शेळ्या ठार केल्या. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले. Junnar

याबाबतची माहिती अशी की, हिवरे खुर्द येथील प्रमोद येंधे शेळी पालनाचा व्यवसाय अनेक वर्षांपासून करीत आहेत. बिबट्याचा शेळ्यावर हल्ला होऊ नये, म्हणून येंधे यांनी शेळयांच्या गोठ्याला लोखंडी तारेची जाळी लावली होती. परंतु शुक्रवारी बिबट्याने लोखंडी जाळी वरच्या बाजूने वाकवून गोठ्यात प्रवेश केला व 8 शेळ्या ठार केल्या व 1 घेऊन गेला.

दरम्यान, 1 बिबट्या 10 शेळ्या एकाच वेळी ठार करण्याची शक्यता कमी असून दोन बिबटे गोठ्यात आले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. वन खात्याच्या धोरणानुसार मृत व जखमी शेळ्यांची भरपाई देण्यात येणार आहे.

तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला असून पाळीव प्राण्यांबरोबरच माणसांवर देखील हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश

मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर

तुम्ही तर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर घणाघात

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

संबंधित लेख

लोकप्रिय