Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडजनभूमी विशेष लेख : बुलेट ट्रेन नको, रेल्वेची सुरक्षित ट्रेन महत्वाची

जनभूमी विशेष लेख : बुलेट ट्रेन नको, रेल्वेची सुरक्षित ट्रेन महत्वाची

मुंबई अहमदाबाद 320 किमीची वेगवान बुलेट ट्रेन अद्यापपही कागदावर आहे. बालासोर येथील भीषण अपघातामुळे सामान्य प्रवासी व एकूण रेल्वेच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुलेट ट्रेन की सुरक्षित ट्रेन हा व्यावहारिक प्रश्न आहे. 20 नोव्हेंबर 2016 मध्ये इंदोर पटना एक्सप्रेसच्या भीषण अपघातात 120 प्रवासी ठार झाले होते. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर रेल्वेचे स्वतंत्र अंदाजपत्रक रद्द करून केंद्रीय बजेटमध्ये रेल्वे व्यवस्थापन खर्च जमा समाविष्ट केला.

भारतीय रेल्वे जगातील दोन नंबरची मोठी कंपनी आहे.ब्रिटिश काळापासून रेल्वेला मिळालेले स्वतंत्र आर्थिक व्यवस्थापनाचे अधिकार मोदी सरकारने काढून घेतले. 1950 मध्ये रेल्वेतील खाजगी कंपन्यांचे अधिकार काढून सरकारी भारतीय रेल्वे केंद्रसरकारच्या मालकीची झाली. भारतीय रेल्वे दररोज 231 लाख प्रवासी आणि 33 लाख टन मालाची वाहतूक करते. भारतीय रेल्वेच्या मालकीत भारतीय रेल्वेमध्ये 12,147 इंजिने,74,003 प्रवासी डबे आणि 28,9185 वाहीणी आहेत आणि रोज 8,702 प्रवासी गाड्यांसहित एकूण 13,523 गाड्या धावतात. भारतीय रेल्वेची 300 रेल्वे यार्डे 2,300 मालधक्के आणि 700 दुरुस्ती डेपो केंद्रे आहेत. ही रेल्वे जगातील चौथी सर्वांत मोठ्या रेल्वेसेवा आहे.13 लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, कर्मचारीसंख्येत जगातील आठवी सर्वांत मोठी व्यावसायिक संस्था आहे.

त्यामुळे रेल्वेसाठी स्वतंत्र आर्थिक,प्रशासकीय व्यवस्थापन काँग्रेससरकरच्या काळात कायम ठेवण्यात आले.मात्र मोदी सरकारच्या काळात रेल्वे मंत्रालयास दुय्यम दर्जा मिळू लागला,फक्त रेल्वे स्टेशन चकाचक करून किंवा वंदे भारत,बुलेट ट्रेन सारखे मोजकी कामावर जागतिक स्तरावरील रेल्वे बनवता येत नाही,किंवा रेल्वेचे खाजगीकरण करून रेल्वेसेवा दर्जेदार बनवू शकत नाही. रेल्वे सुरक्षा कमिशनच्या 2019-20 च्या रिपोर्टनुसार देशात 2015-16 ते 2019-20 या काळात छोटेमोठे 427 अपघात होऊन 353 लोक मृत्युमुखी पडले होते.

रेल्वेचे ट्रॅकस,सिग्नल यंत्रणा जोपर्यंत जागतिक दर्जाच्या होत नाहीत,तोपर्यंत 120 ते 300 स्पीडच्या वेगवान ट्रेनची आपण कल्पना करू शकत नाही . बुलेट ट्रेन सारखी अतिशय खर्चिक किंवा अन्य मोजक्या रेल्वे सुरू करून संपूर्ण यात्री सुरक्षा आजही रेल्वेला शक्य नाही. मुंबईची लोकलची गर्दी,पुण्याहून उत्तर भारतात अनेक रेल्वेमध्ये सामान्य प्रवासी कोंबलेल्या डब्यातून प्रवास करत आहेत, याचा ही विचार करायला हवा. देशातील मोठ्या औद्योगिक व स्मार्ट सिटीमध्ये नागरिक रेल्वे लाईन विस्तारीकरण न झाल्यामुळे सुखद रेल्वे प्रवासापासून वंचित आहेत.

भारतातील प्रवाशांसाठी रेल्वे ही जीवनवाहिनी आहे.लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अल्प उत्पन्न आणि मध्यम गटातील लोकांकडून रेल्वेचाच पर्याय निवडला जातो. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लांबच्या प्रवासासाठी बसचा प्रवास तेवढा सोईचा नसतो, त्यामुळे बुलेट ट्रेन किंवा अन्य प्रचारकी प्रकल्पापेक्षा बहुसंख्य प्रवासी जनतेला सुखद, सुरक्षित, माफक रेल्वेसेवा देण्यासाठी विशेष धोरण सरकारकडे असले पाहिजे.

रेल्वेकडे सध्या अपुरे मनुष्यबळ आहे,देखभाल दुरुस्ती विभागात हजारो पदे रिक्त आहेत, मोटरमन, कुशल ड्रायव्हर पुरेसे नसल्याने अतिरिक्त वेळ वाढवून मेल एक्सप्रेस धावत आहेत.164 वर्षे झालेल्या भारतीय रेल्वेला कुशल मनुष्यबळ, आधुनिक दर्जा देण्यासाठी बरेच काम बाकी आहे,कारण ब्रिटिश काळातील जुने रेल्वे मार्गावर आजही ट्रेन धावत आहेत, फक्त कोकण रेल्वे प्रकल्प सोडला तर इतर कोणत्याही नव्या रेल्वेमार्गांची निर्मिती झालेली नाही.त्यामुळे मोदी साहेब बुलेट ट्रेन नको, सुरक्षित ट्रेन हवी आहे.

क्रांतीकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय