जुन्नर : शासकिय गायरान जमिनी अतिक्रमणं धारकांच्या नावे करण्यात याव्यात या प्रमुख व इतर अन्य मागण्यांकरिता वंचित बहुजन आघाडी, जुन्नर तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून तेथुन जुन्नर बस स्टँड ते परदेशपुरा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून पुढे धान्य बाजार जुन्नर तहसील कार्यालय असा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. (Jan Aakrosh Morcha at Junnar Tehsil Office on behalf of Vanchit Bahujan Aghadi)
या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी केले. यावेळी पुणे जिल्हा पक्ष निरिक्षक रामभाऊ मरगळे, उत्तम वंशिव, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमाताई भालेसाईन, एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव,पुणे जिल्हा महासचिव नवनाथ गायकवाड, निलेश वामने, प्रियांका लोंढे, उपाध्यक्षा मालती बडेकर, सल्लागार जावेद मोमीन, बाळासाहेब मोरे, जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश वाव्हळ, महासचिव सागर जगताप, आंबेगाव तालुका अध्यक्ष शिवाजी राजगुरू, खेड तालुका अध्यक्ष महेंद्र नाईकनवरे, आंबेगाव तालुका महिला आघाडी अध्यक्षा दिपाली साबळे, जुन्नर तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष पुजा जगताप,उपाध्यक्ष एकनाथ भांडलकर, आरीफ मोमीन, संतोष पवार, सचिव राहुल धोत्रे, संघटक शरद पंडीत, रविंद्र भोजने, प्रणव शिरसाठ, किशोर कडलाक, आने शाखा अध्यक्ष कासम चौगुले, उदापूर शाखा अध्यक्ष अभिजीत माळवे, सागर पवार, विलास नागरे, मनोहर गायकवाड, प्रकाश गायकवाड, तसेच जुन्नर तालुक्यातील गायरान अतिक्रमणं धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जुन्नर तालुक्यातील अतिक्रमणं धारक यांनी आपल्या समस्या मांडत आक्रोश केला. तसेच मोर्चास प्रा.किसन चव्हाण, सीमाताई भालेसाईन, उत्तम वनशिव, राम भाऊ मर्गळे, अनिल जाधव, शरद पंडीत, निलेश वामणे यांनी मनोगत व्यक्त केले व मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिसे व मनोहर गायकवाड यांनी यांनी केले तर आभार गणेश वाव्हळ यांनी केले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुका पदाधिकारी, शाखा पदाधिकारी, जुन्नर तहसिल कार्यालय, जुन्नर पोलीस स्टेशन यांनी सहकार्य केले.
BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती
NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती
बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज
कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागात 250 रिक्त पदांची भरती
ZP : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत 991 पदांची भरती, ऑनलाईन करा अर्ज
ZP : कोल्हापुर जिल्हा परिषद अंतर्गत 728 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज !
Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती