Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकला कौशल्य पारंगत विद्यार्थ्यांचे कौतूक करताना आनंद व अभिमान वाटतो – ब्रिगेडियर...

कला कौशल्य पारंगत विद्यार्थ्यांचे कौतूक करताना आनंद व अभिमान वाटतो – ब्रिगेडियर एस.पी.दास

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : आपले विद्यार्थी ज्ञानार्जन करत असताना प्राविण्य मिळवत आहेत‌ स्पर्धेच्या युगात आवश्यक असलेल्या विविध क्षेत्रात पारंगत होत आहेत. क्रीडा, कला, ट्रेकिंग, गिरिभ्रमण या क्षेत्रात राज्यात देशात विविध स्पर्धामध्ये पारितोषिके मिळवत आहेत. अशा मुलामुलींचे कौतुक करताना आनंद व अभिमान वाटतो, अशा भावना ब्रिगेडियर एस पी दास यांनी खडकी येथील कौतुक समारंभात व्यक्त केल्या. It is a pleasure and a pride to appreciate students who have mastered art skills – Brigadier S.P. Das

It is a pleasure and a pride to appreciate students who have mastered art skills – Brigadier S.P. Das

CA FVD खडकी येथील सेंट्रल A FV depot एम्प्लॉइज को-ऑप सोसायटी ने आयोजित केलेल्या कौतुक समारंभात युनियन व पतपेढीचे पदाधिकारी, मान्यवरांच्या उपस्थितीत दहावी, बारावीतील गुणवंत तसेच एमपीएससी स्पर्धा परीक्षा, स्विमिंग, क्रीडा, एव्हरेस्ट आदी क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन चे राष्ट्रीय सचिव सी. श्रीकुमार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, टेलिकम्युनिकेशन, केंद्र-राज्य सरकारच्या विविध प्रशासकीय सेवा आदी सर्व क्षेत्रात मोबाईल, इंटरनेट क्रांती झाली आहे. सॉफ्ट स्किल्सच्या जमान्यातील मोबाईल सारखी साधने बरेच काही शिकवत आहेत, त्यातील माहितीचा उपयोग व्यक्तिगत उत्कर्षासाठी विद्यार्थ्यांनी करावा. आता पालकांनी विद्यार्थ्यांचे करिअर घडवू नयेत, तो जुना काळ राहिला नाही, त्यांच्या आवडीचे करिअर शिक्षण निवडायचे अधिकार मुलांना द्यावेत, असे सी.श्रीकुमार यांनी सांगितले.

It is a pleasure and a pride to appreciate students who have mastered art skills – Brigadier S.P. Das

यावेळी निशिगंधा घारे, आर्यन चव्हाण, प्रियांका साठे, सारंग बुगडे, साक्षी हेमाडे, तन्मय शेडगे, स्वरूप तोडकर, शुभांगी पवार, अथर्व बुर्डे, सिद्धांत चव्हाण, डोकन्ना साई, वैष्णवी पाडेकर, सुशांत लांडे तसेच विविध क्षेत्रात मानांकित वैष्णवी जगताप, रितू फ्रान्सिस, गायत्री भालेराव, शिवम दारव्हटकर, महेंद्र परिहार, लहू उघडे, रोशन चट्टे, गणेश बुर्डे यांचा तसेच पिंपरी चिंचवडच्या सामाजिक कार्यकर्त्या सीता ताई केंद्रे यांचा सत्कार ब्रिगेडियर एस पी दास व सी श्रीकुमार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी डेपोचे कमांडंट ब्रिगेडियर एस.पी.दास तसेच प्रशासन अधिकारी कर्नल उज्जल खातेवडी,सी श्रीकुमार, राष्ट्रीय सचिव AIDEF. AIDEF चे राष्ट्रीय खजिनदार कॉम्रेड मोहन होल, विशाल डुंबरे, सोन्याबापू घोगरे, अमित गजमल, सचिन कांबळे, दिनेश भिंताडे, सलीम सय्यद, शैलजा कडुलकर आदी 

उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय