Sunday, May 5, 2024
Homeताज्या बातम्याMumbai Central Park : महालक्ष्मी रेसकोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क

Mumbai Central Park : महालक्ष्मी रेसकोर्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क

Mumbai Central Park : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जागेत मुंबई महानगरपालिकेकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क (Mumbai Central Park) विकसित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महालक्ष्मी रेसकोर्सच्या 211 एकर जागेपैकी 120 एकर भूखंडावर न्यूयॉर्क (अमेरिका), लंडन इंग्लंड (यूके) येथील पार्कच्य धर्तीवर हा पार्क विकसित केला जाणार आहे. Mumbai Central Park

हा भूखंड शासनाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात येणार असून त्यावर जनतेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विकसित करण्यात येईल.

महालक्ष्मी रेसकोर्स येथील मे .रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडावरील कराराची 1 जून,2013 ते सदर भूभागाचा प्रत्यक्षात ताबा घेण्याच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीसाठीच्या भाडेपट्ट्याचे नुतनीकरण करण्यात मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे सदर कालावधीसाठी द्याव्या लागणाऱ्या रकमेच्या फरकाची रक्कम महसूल व वन विभागाने निश्चित करुन दिलेल्या दरानुसार मुंबई महानगरपालिकेद्वारे वसुल करण्यात येईल. Mumbai Central Park

तसेच, महालक्ष्मी रेसकोर्स येथील एकूण 211 एकर भूखंडापैकी मे.रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांना 91 एकर भूखंड प्रत्यक्षात ताबा देण्याच्या दिनांकापासून ते पुढील 30 वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्याच्या अनुषंगाने सदर भाडेपट्ट्याचे नुतनीकरण हे वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या तरतूदीनुसार करण्यास मान्यता देण्यात आली.

महसूल विभागाच्या 23 जून 2017 च्या शासन निर्णयानुसार मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 मधील अनुसूची “डब्ल्यू” मधील महालक्ष्मी रेसकोर्स, विविध जिमखाने व तत्सम भूभाग या मालमत्तांना अनुषंगीक तरतूदी लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

महत्वाची बातमी : यापुढे शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक, ‘असा’ नावाचा असेल अनुक्रम

मोठी बातमी : देशात CAA’नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू

इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश

आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार यांचे मोठे विधान

मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय