Friday, September 20, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार ; पुढील 4 ते...

मोठी बातमी : राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार ; पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे!

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सातारा, आणि सांगली परिसरात महापुराचा धोका निर्माण झाल्याने प्रशासन सतर्क मोडवर आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती, परंतु आता हवामान विभागाने पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. (Maharashtra Rain)

मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा, आणि कोल्हापूर येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. पुण्यात पहिल्यांदाच पावसाने रेकॉर्ड मोडला आहे, तर मुंबईत पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाली असून काही विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. (Maharashtra Rain)

सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात 30 आणि 31 जुलै व 1 ऑगस्ट रोजी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain

पुण्याच्या घाट परिसरात खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्या भागाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. विशेषत: घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन

ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाअंतर्गत योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अंगणवाडी मदतनीस पदांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज!

संबंधित लेख

लोकप्रिय