Wednesday, May 8, 2024
Homeजिल्हाजाती बंधने तोडून डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या गणपतीची कोल्हापूरमध्ये प्रतिष्ठापना

जाती बंधने तोडून डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या गणपतीची कोल्हापूरमध्ये प्रतिष्ठापना

पुरोगामी विचारांचे कोल्हापूर याची प्रचिती !

कोल्हापूर / यश रुकडीकर
: छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे कोल्हापूर हे जगात भारी आहे यात शंका नाही.महाराष्ट्रात तद्वतच संपूर्ण भारतात कोणी पाहिला नसेल असा गणपतीचा देखावा मंगळवार पेठ येथील राधाकृष्ण भक्त मंडळाने उभा केला आहे. श्रीकृष्णाच्या रुपात गणपती बाप्पा क्रुसावरील येशु ख्रिस्तांना मलमपट्टी करीत असून यातून प्रेम, दया, शांती व समतेचा संदेश देणाऱ्या येशूंच्या भळभळत्या जखमांवर प्रेमाची फुंकर गणपती बाप्पा घालत असल्याचा देखावा मन मोहून घेतो. ह्या मंडळाने ह्या गणपती देखाव्यातून सामाजिक बांधिलकी व एकोप्याचे दर्शन फक्त कोल्हापूरच न्हवे तर संपूर्ण जगासमोर उभे केले आहे.

सन २०२२ हे मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीकृष्णाच्या रुपात असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

भारत भूमी ही विविध पंथ, संप्रदाय, धार्मिक विचार, समृद्धी आणि विविधतेने नटलेली भूमी आहे. भारतीय संविधानात “धर्मनिरपेक्ष” या मूल्याचा स्विकार करून सर्व धर्म – संप्रदायांना समान न्याय देण्यात आलेला आहे. या मूल्याचा आदर राखत सुप्रसिद्ध चित्रकार श्री वासुदेव कामत यांनी श्रीकृष्ण व येशू ख्रिस्त यांच्या वर आधारीत रेखाटलेल्या चित्र माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर कलाकृतीचा आधार घेऊन तसेच शिवछत्रपती व राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर शहराच्या पूरोगामी विचारांना पाईक राहून राधा कृष्ण भक्त मंडळाने यावर्षी “श्रीं” ची मूर्ती साकारली आहे. सदर कलाकृती मधून धार्मिक व सामाजिक ऐक्याचा म्हणजेच ‘धर्मनिरपेक्ष’ मूल्य जपण्याचा संदेश देण्याचा मंडळाने प्रयत्न केला आहे.

उत्सव कमिटीचे अध्यक्ष शिरीष पाटील, उपाध्यक्ष आशिष ढोबळे, केशव पंडे, सुशांत ढोबळे, विशाल कारंडे व इंद्रर्जित भोंगाळे यांच्यासह मंडळातील प्रत्येकाने या अभूतपूर्व गणपती देखाव्यासाठी परिश्रम केले आहे.

Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय