Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकुदळवाडी रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजवा – दीपक गुप्ता यांची आयुक्तांकडे मागणी

कुदळवाडी रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजवा – दीपक गुप्ता यांची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी चिंचवड : कुदळवाडी रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजवा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस दीपक गुप्ता यांनी आयुक्त शेखरसिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जुलै पासून सतत पडत असलेल्या पावसामुळे कुदळवाडी ते मोई फाटा या सर्वात जास्त रहदारीच्या आणि गजबजलेल्या रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली आहे. या रस्त्यावर पेट्रोल पंप, पोलिस चौकी, किराणा दुकाने, हाऊसिंग सोसायट्या, बँक एटीएम, स्क्रॅप कलेक्शन दुकाने, वर्कशॉप, वजन काटा, हॉटेल्स आहेत. या रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यामुळे दुचाकी, चारचाकीचे मोठे अपघात होऊन मृत्यु होऊ शकतो.

चिखली कुदळवाडीतील या अतिशय गजबजलेल्या रस्त्याची दुरवस्था होऊन संपूर्ण रस्ता अपघात प्रवण झाला आहे. येथे स्ट्रीट लाईट बंद आहेत, त्यामुळे रस्त्याची दृश्य मानता कमी झाली आहे. चिखली, कुदळवाडी, पवारवस्ती, मोईफाटा अंतर्गत भागातील सर्व रस्त्याची विशेष पाहणी करून तत्काळ रस्ते विकसित करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय