Thursday, May 9, 2024
Homeराज्यसामान्यांना पुन्हा महागाईचा झटका!, दुधाच्या दरात मोठी वाढ, "या"ही वस्तूच्या किंमती वाढणार

सामान्यांना पुन्हा महागाईचा झटका!, दुधाच्या दरात मोठी वाढ, “या”ही वस्तूच्या किंमती वाढणार

मुंबई : एकीकडे सणासुदीचे दिवस असतानाच पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे. अलिकडेच अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. या पाठोपाठ आता मुंबईत सुट्या दुधाच्या किमतीत ७ रुपयांनी वाढ होणार आहे.

जनावराच्या चाऱ्याचा खर्च वाढला आहे. हरभरा सारख्या चाऱ्याचे दर वाढले आहेत. याचा परिणाम आता दुधावर किंमतीवर होताना दिसत आहे. अलिकडेच अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर आता मुंबईत १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार असून आता १ लिटर दूध ८० रुपयांना मिळेल. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

एकीकडे दूधाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर दिवाळीपर्यंत पोहे, चिवडा इत्यादी फराळाच्या साहित्याचे दरही वाढणार आहेत. गेल्या तीन महिन्यांत कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे किरकोळ बाजारात पोहे, भडंग, मुरमुऱ्याच्या दरात किलोमागे सरासरी पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत यात आणखी वाढ होईल असे सांगितले जात आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय