Friday, April 26, 2024
Homeराष्ट्रीयऑक्टोबरपासून महागाई स्थिरावू शकते, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा विश्वास

ऑक्टोबरपासून महागाई स्थिरावू शकते, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा विश्वास

नवी दिल्ली : देशभरातील वाढत्या माहागाईने उच्चांक गाठला आहे. दररोज विविध वस्तूंच्या किंमती वाढताना दिसत असताना रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ऑक्टोबरपासून किमती स्थिरावू लागतील आणि महागाई संबंधी स्थिती हळूहळू सुधारताना दिसेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर जनतेचा विश्वास आणि भरवशाच्या मोजमापाचे परिमाण म्हणून चलनवाढीकडे पाहायला हवे, असे दास यांनी कौटिल्य आर्थिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन केले. तसेच, पुरवठय़ाच्या आघाडीवर अनुकूल स्थिती दिसत असून, एप्रिल ते जून २०२२ या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची फेरउभारी दर्शविणारे ठळक निर्देशकांची आकडेवारी पाहता, आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या उत्तरार्धात महागाईत हळूहळू उतार दिसू शकेल, असे मध्यवर्ती बँकेचे अनुमान असल्याचे गव्हर्नरांनी सांगितले.

सध्याचे युग महागाईच्या जागतिकीकरणाचे असल्याचेही आरबीआय गव्हर्नर म्हणाले आहेत. याचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, कोरोना महामारीमुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु महागाई अजूनही समस्या आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय