Thursday, November 21, 2024
Homeराष्ट्रीयInflation : खिशाला मोठा झटका, महागाई वाढली

Inflation : खिशाला मोठा झटका, महागाई वाढली

नवी दिल्ली : संपूर्ण देशात किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये 5.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑगस्टमध्ये हा दर 3.65 टक्के होता. अधिकृत आकडेवारीनुसार, हा किरकोळ महागाईचा 9 महिन्यांतील सर्वाधिक स्तर आहे. यामागे पालेभाज्या, फळे यांच्या किमतीत झालेली सतत वाढ आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी उत्पादन कारणीभूत आहे. (Inflation)


विशेषता जीवनावश्यक डाळी, कडधान्ये,खाद्यतेल, कांदा, लसूण यातील वाढ सर्वाधिक आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मध्यम कालावधीसाठी किरकोळ महागाई दर 4% ठेवण्याचा उद्देश ठेवल्याचे जाहीर केले होते, परंतु सप्टेंबरमध्ये हा दर याहीपेक्षा जास्त राहिला आहे. जुलै नंतर प्रथमच महागाई दर RBI च्या अंदाजापेक्षा 4% च्या जास्त आहे.

देशातील अल्प उत्पन्न गटातील असंघटीत, रोजंदारी ३८ कोटी कामगार मजूर (labours) यांना या काळात महागाईचा चटका बसत आहे. रोजच्या जेवणातील कांदा, लसूण, खाद्यतेल महाग झाले आहे. खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर मोठ्या प्रमाणात वाढला असून, तो 9 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये घाऊक खाद्यान्न महागाई दर 9.47 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, अन्नपदार्थांची महागाई दर सप्टेंबरमध्ये 9.24% झाली आहे, जे ऑगस्टमध्ये 5.66% होते. ग्रामीण भागात महागाई दर ऑगस्टमध्ये 4.16% वरून सप्टेंबरमध्ये 5.87% झाला आहे. तर, शहरी भागात हा दर ऑगस्टमध्ये 3.14% वरून सप्टेंबरमध्ये 5.05% झाला आहे. (Inflation)

काही काळापासून भारतात अन्नपदार्थांची विशेषतः भाज्या आणि इतर पटकन खराब होणाऱ्या वस्तूंच्या किमतीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कारण अतिवृष्टी देशभर झाल्यामुळे आवश्यक पीक, भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. (Inflation)

टोमॅटो, कांदा, डाळींच्या किंमतीही या वर्षाच्या जानेवारीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 2023 च्या दुष्काळाच्या वर्षातही इतका महागाई दर नव्हता.

संबंधित लेख

लोकप्रिय