Sunday, May 19, 2024
HomeNewsआळंदीत इंद्रायणी नदी पायी परिक्रमा सांगता समारंभ

आळंदीत इंद्रायणी नदी पायी परिक्रमा सांगता समारंभ

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) येथील इंद्रायणी मातेची पायी परिक्रमा नवनाथ महाराज आहेर, सीमाताई महाराज आहेर आणि बाळ राघव आहेर यांचे वतीने दहा दिवसीय इंद्रायणी नदीची परिक्रमा हरिनाम गजरात इंद्रायणी नदी घाटावर विधीवत संकल्प करून घेतलेले जल, त्याची विधिवत सोड संकल्प पुजा करून माऊलींचे संजीवन समाधी, श्री सिद्धेश्वर महाराज यांना जल चढऊन इंद्रायणी पायी परीक्रमेची सांगता आळंदीतील विश्वरूप दर्शन मंचावर हरिनाम गजरात झाली.

पायी इंद्रायणी परिक्रमेची सुरुवात श्री क्षेत्र आळंदी ( हवेली ) येथून इंद्रायणी नदीच्या दक्षिण तटावरून विधिवत इंद्रायणीचे जल भरून विधिवत पुजा, इंद्रायणी आरती पठन करून शिस्त आणि नियम बद्ध विश्व शांती केंद्र आळंदी येथुन करण्यात आली होती. इंद्रायणी परिक्रमा मार्गावर रस्त्यात अनेक तिर्थ दर्शन घेत घेत नविन मार्ग काढत देहु, वडगांव मावळ, नानोली, मळवली,कुरवंडे, लोणावळा,कार्ला,बेलज,खालुंब्रे, आळंदी, मरकळ, निर्गुडी, चऱ्होली या मार्गे पुन्हा आळंदी या प्रमाणे संपुर्ण पायी परीक्रमाकरण्यात आली. सांगता प्रसंगी विधीवत संकल्प करून घेतलेले जल, त्याची विधिवत सोड संकल्प पुजा करून आळंदी येथे श्री माऊलींना, श्री सिद्धेश्वराला जल चढऊन इंद्रायणी पायी परीक्रमेची सांगता करण्यात आली.


यापुढील परिक्रमा नर्मदेची असून नवनाथ महाराज आहेर यांनी नर्मदेच्या चार पायी परिक्रमा नर्मदा माई ने करून घेतल्याचे सांगितले. या शिवाय बसद्वारे १७ परीक्रमा परिक्रमा करण्यात आल्या आहेत. सामाजिक कार्य जनजागृती करीत असताना आता ४ डिसेंबर पासून नर्मदेची १८ वी परिक्रमा सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या परिक्रमा काळात गरीब, आदिवासी, पायी नर्मदा परीक्रमा करणाऱ्या भाविकांना स्वतः आहेर महाराज सपत्नीक आपल्या लहानग्या राघव समवेत घेऊन सेवा व अखंड अन्नदान करत करीत असतात. त्यांचा लहान मुलगा राघव हा दिड वर्ष वय असतांना नर्मदेची पायी नर्मदा परिक्रमा माता पित्यांसोबत नर्मदा माईने करून घेतली. आळंदी येथील इंद्रायणी परिक्रमेची सांगता हरिनाम गजरात आळंदीतील विश्वशांती केंद्राचे विश्वरूप दर्शन मंच येथे इंद्रायणी परिक्रमेची सांगता करण्यात आली. यावेळी भाविक, नागरिकांनी स्वागतास गर्दी केली होती. आळंदी जनहित फाउंडेशन तर्फे मामाबुवा गजरे, नवनाथ आहेर यांना अध्यक्ष राजेंद्र घुंडरे यांचे हस्ते नर्मदा परिक्रमेस शुभेच्छा देण्यात आल्या.

Lic
Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय