Sunday, May 19, 2024
HomeNews28 नोव्हेंबर रिक्षा संप : लोकशाही मार्गानेच लढा देऊ – बाबा कांबळे

28 नोव्हेंबर रिक्षा संप : लोकशाही मार्गानेच लढा देऊ – बाबा कांबळे

रिक्षा चालकांच्या संप दरम्यान अनुचित घटनांना महाराष्ट्र रिक्षा पंचायतचा पाठिंबा नाही : बाबा कांबळे

रिक्षा बंद आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवा रिक्षा चालक मालकांना बाबा कांबळे यांचे आवाहन

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: केंद्र व राज्य सरकार रिक्षा चालक, मालकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याने रिक्षा चालक, मालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. 28 नोव्हेंबर पासून विविध संघटना संप पुकारणार आहेत. या दरम्यान कोणत्याही अनुचित घटना होणार नाहीत यासाठी रिक्षा चालक मालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेऊन लोकशाही व संविधानिक कायदेशीर मार्गानेच रिक्षा चालक मालकांसाठी लढा देऊ. संप सुरू असताना काही चुकीच्या घटना घडल्यास त्याला महाराष्ट्र रिक्षा पंचायत पाठिंबा देणार नसल्याचे बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा चालक, मालक यांचे प्रश्न सुटण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. अनेक आंदोलने, मोर्चे आयोजित करण्यात आली आहेत. सरकारसह, प्रशासनाला देखील धारेवर धरले आहे. संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सुटले आहेत. काही प्रश्न शासनाच्या आणि सरकारच्या उदासीनतेमुळे रखडलेले आहेत. त्याविरोधात सर्वच रिक्षा चालकांच्या मनात रोष आहे. हा रोष २८ नोव्हेंबर पासून संपाद्वारे बाहेर येत आहे. या संपाला महाराष्ट्र रिक्षा पंचायत सहभागी आहे.

मात्र संप सुरु असताना या आंदोलनाला गालबोट लागेल असा मार्ग नको. रिक्षा चालकांत फूट पडेल असे काम कोणी करू नये चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालण्याचे काम महाराष्ट्र रिक्षा पंचायत करणार नसल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

रिक्षा चालकांचे हातावरचे पोट आहे. महागाई, कोरोना काळातील लॉकडाऊन, फायनान्स कंपन्यांचे हफ्ते, थकले आहेत, टू व्हिलर बाईक रीपिडो,ओला-उबेर सारखी खाजगी प्रवासी वाहतूक या मुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून ते मेटाकुटीला आले आहेत. भांडवलदार जन कंपन्या बंद झाल्या पाहिजे त्याच्यावरती शासनाने बंदी आणली पाहिजे.

या आंदोलनामध्ये कोणत्या अनुचित प्रकार घडू नये याची काळजी रिक्षा चालक मालकानी घ्यावी, संप सुरु असताना कोणत्याही चुकीच्या गोष्टींना महाराष्ट्र रिक्षा पंचायत पाठिंबा देणार नाही. रिक्षा चालकांच्या हक्कासाठी पुकारलेल्या संपात करू मात्र कायदेशीर मार्गानेच लढा देऊ, असे बाबा कांबळे म्हणले. रिक्षा चालक-मालकांनीही कोणत्याही चुकीच्या गोष्टींना बळी पडू नये, असे देखील आवाहन बाबा कांबळे यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय