Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवडकरांना दिवसाआड पाणी हे भाजपचेच पाप ! – अजित गव्हाणे 

पिंपरी चिंचवडकरांना दिवसाआड पाणी हे भाजपचेच पाप ! – अजित गव्हाणे 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळातील 15 वर्षात पिंपरी-चिंचवडकरांना कोणत्याच संकटांना सामोरे जावे लागले नाही. कारण शहराचे पालक या नात्याने शहराच्या उत्तम नियोजनासाठी अजित पवार यांचे बारीक लक्ष असायचे. मात्र, 2017 मध्ये भाजपने सत्ता काबीज केली आणि त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मुबलक पाऊस असूनही शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची वेळ येते, यापेक्षा शहरवासीयांचे दुर्दैव ते काय? नागरिकांच्या तोंडचे आणि हक्काचे पाणी पळविण्याचे हे भाजप नेत्यांचेच पाप आहे. या पापाला माफी नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला. 

रामकृष्ण मंगल कार्यालय, मोशी येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 व्या मासिक सभेत गव्हाणे बोलत होते. याप्रसंगी भाऊसाहेब भोईर, विठ्ठल काटे, रविकांत वर्पे, प्रशांत शितोळे, कविता आल्हाट, मयूर कलाटे, वसंत बोराटे, राहुल भोसले, सुनील गव्हाणे, फजल शेख, प्रशांत शितोळे, शाम लांडे, विनोद नढे, पंकज भालेकर, विनायक रणसुभे, राजेंद्र जगताप, विक्रांत लांडे, प्रविण भालेकर, वर्षा जगताप, सतीश दरेकर, प्रकाश सोमवंशी, निर्मला माने, विनय शिंदे, माधव पाटील, विजय पिरंगुटे, महेश झपके, लाल महंमद चौधरी, गणेश सस्ते, युसूफ कुरेशी, अकबर मुल्ला, ऍड. विशाल जाधव, विशाल आहेर, ज्योती निंबाळकर, सारिका पवार, संगीता कोकणे, काशिनाथ जगताप, प्रवीण भालेकर, कविता खराडे,अतिष बारणे, धनंजय भालेकर, चंदाराणी लोखंडे, राजू लोखंडे, भाऊसाहेब सुपे, विजय लोखंडे, दत्तात्रय जगताप, श्रीधर वाल्हेकर, पौर्णिमा सोनवणे, संजय अवसरमल, प्रमोद साळवे, संजय उदावंत, विष्णू शेळके, विजय पिरंगुटे, सुप्रिया सौलपुरे, उत्तम आल्हाट, पुनम वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना गव्हाणे म्हणाले की, 2017 मध्ये शहरात सत्तापरिवर्तन झाले आणि शहराचा विकास ठप्प झाला. सत्तांध भाजप नेत्यांवर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे विकासाची दिशा भरकटून पिंपरी चिंचवडमधील सर्वसामान्य जनतेचे हाल सुरू झाले. या हालअपेष्टांचा हिशोब नागरिक मतांच्या रूपाने केल्याशिवाय राहणार नाही, असे गव्हाणे म्हणाले. राष्ट्रवादीने शहराचा केलेला विकास आणि भाजपने केलेले शहर भकास हे चित्र प्रत्येक कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचविण्याचे आवाहन गव्हाणे यांनी यावेळी केले. या बैठकीत बूथ कमिटी सक्षमीकरण तसेच सदस्य नोंदणी अभियानाबाबत विषयवार चर्चा करण्यात आली.

यावेळी कविता आल्हाट, सुनील गव्हाणे, फजल शेख, विजय लोखंडे, काशिनाथ जगताप, सतीश दरेकर, रविकांत वर्पे आदींनी मनोगत व्यक्त केले. विनायक रणसुभे यांनी प्रास्ताविक केले. वसंत बोराटे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन दीपक साकोरे यांनी केले.

Lic
Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय