Friday, May 17, 2024
Homeक्रीडाविश्ववर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा जलवा, निकहत-नीतूसह चार बॉक्सरची फायनलमध्ये एन्ट्री

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा जलवा, निकहत-नीतूसह चार बॉक्सरची फायनलमध्ये एन्ट्री

राजधानी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या महिला विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंनी दबदबा राखला आहे. निकहत जरीन आणि नितूसह चार महिला बॉक्सरने वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

त्यामुळे भारताची चार पदके पक्की झाली आहेत.

भारतीय बॉक्सर निकहत जरीन हिने 50 किलोग्राम वजनाच्या गटात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत निकहतने कोलंबियाच्या इनग्रिड वॅलेंसिया हिचा पराभव केला. तर 22 वर्षीय युवा बॉक्सर नीतू घंघास हिने कझाकिस्तानच्या अलुआ बल्किबेकोवा हिचा सेमीफायनलमध्ये पराभव करत फायनल गाठली आहे.

रियो ऑलम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारी कोलंबियाची इनग्रिड वॅलेंसिया हिचा निकहत जरीनने सेमीफायनलमध्ये पराभव केला. या सामन्यात निकहतने सुरुवातीपासूनच आपला दबदबा राखला होता. 50 किलोग्रॅम वजनाच्या गटात निकहतने 5-0 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवत फायनलमध्ये आपली जागा पक्की केली.
तर नीतू घंघास हिनेही दमदार प्रदर्शन केले. नीतूने 48 किलो वजनी गटात एकतर्फी विजय मिळवता. कझाकिस्तानच्या अलुआ बल्किबेकोवा हिचा नीतूने 5-2 च्या फरकाने पराभव केला. या विजयामुळे भारताची पदके पक्की झाली आहेत.
चार महिला बॉक्सरचा फायनलमध्ये प्रवेश –

महिला वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या चार खेळाडूंनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. निकहत आणि नीतू यांच्यासइवाय लवलीना आणि स्वीटी यांनीही उपांत्य सामन्यात विजय मिळवला आहे. चार बॉक्सरने फायनलमध्ये प्रवेश केल्यामुळे भारताची चार पकजे पक्की झाली आहेत. लवलीना हिने 75 किलोग्रॅम वजन गटात तर स्वीटी बूरा हिने 81 किलोग्रॅम वजनी गटात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय साक्षी चौधरी हिला 52 किलोग्रॅम वजनी गटात क्वार्टर फायनलमध्ये चीनच्या खेळाडूकडून पराभवाचा सामना करावा लागला. 2022 ची कांस्य पदक विजेती मनिषा मौन हिला फ्रान्सच्या अमीना जिनाही हिच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. निकहत, नीतू, लवलीना आमि स्वीटी यांनी फायनलमध्ये प्रवेश केल्यामुळे भारताची चार पदके पक्की झाली आहेत.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय