Monday, May 20, 2024
Homeआंतरराष्ट्रीयभारत चीन तणाव ; त्या व्हिडिओने खळबळ, केंद्र सरकार खोटे बोलत असल्याचा...

भारत चीन तणाव ; त्या व्हिडिओने खळबळ, केंद्र सरकार खोटे बोलत असल्याचा राहुल गांधींचा आरोप

(प्रतिनिधी):- लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय-चिनी सैन्यात चकमक झाली. यात भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले. त्यानंतर सरकार सातत्याने खोटे बोलत आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी केला होता. आता त्यांनी एक खळबळजनक व्हिडीओ समोर आणला आहे. ज्यात केंद्र सरकार खोटे बोलत आहे, हे स्पष्ट झाले आहे.

        या व्हिडीओमध्ये एक जखमी सैनिकाचे वडील “न्यूज तक” या वृत्तवाहिनीला आपल्या जखमी जवान मुलाने दिलेली माहिती सांगत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीत आणि सरकारने दिलेल्या माहितीमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. म्हणूनच राहुल गांधीनी ‘तुम्ही खोटे बोलून आमच्या शहिदांचा अपमान करू नका’, असे केंद्र सरकारला सुनावले आहे.

      तसेच प्रियांका गांधी यांनी सुद्धा एक व्हिडिओ ट्विट केला आहे त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे एका प्रसारमाध्यमांवर सांगत आहेत की, चीन आपला दावा करत आहे की, “आमची सीमा इथं पर्यंत आहे तर भारत सुद्धा दावा करत आहेत की आमची सीमा इथं पर्यंत आहे”, तर त्या व्हिडिओ मध्ये पंतप्रधान मोदी यांचा सुद्धा व्हिडिओ टाकण्यात आला आहे ज्यात मोदी सांगतात की, “त्या भागात ना कोणी आले आहे आणि ना घुसले आहे” असे मोदींनी म्हंटले आहे .

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय