Monday, May 20, 2024
Homeग्रामीणसमाजातून व्यसनाला हद्दपार करण्याची ताकद युवकांमध्येच आहे - प्रा. रामचंद्र वाघमारे

समाजातून व्यसनाला हद्दपार करण्याची ताकद युवकांमध्येच आहे – प्रा. रामचंद्र वाघमारे

सोलापूर (प्रतिनिधी) :- स्वत: निर्व्यसनी राहणे, व्यसनापासून लांब राहून, स्वता निरोगी राहणे व समाजातील व्यसनाला हद्दपार कर ण्याची ताकद युवकांमध्ये आहे, असे प्रतिपादन प्रा रामचंद्र वाघमारे सरानी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) सोलापूर जिल्हा कंमिटीतर्फे आयोजित ऑनलाइन व्याख्यानमालेत ते केले.

             स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया एसएफआय सोलापूर जिल्हा कमिटी कडून व्याख्यान माला सुरू आहे. युवक आणि व्यसनाधीनता या विषयी सारथी फौंडेशन चे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी मार्गदर्शन केले आहे.

            ते व्यसनाची व्याख्या देताना म्हणाले, ठराविक एखादी गोष्ट केल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो किंवा त्यातून अस्वस्थता निर्माण होते त्याला व्यसन असे म्हणतात. पुढे ते म्हणाले व्यसन हा आजार नाही ती एक मानिसकता आहे. विविध प्रकारचे लोक व्यसन करतात त्याला आपण व्यसन असे म्हणतो.  

◆ खाण्याच्या स्वरूपात व्यसन -पान तंबाखू, गुटखा, झोपेच्या गोळ्या, गांंजा.

◆ ओढण्याचे व्यसन – विडी सिगारेट, तपकिर, गांंजा.

◆ नशाचे व्यसन – दारू, ताडी, माडी.

◆ मादक व्यसन -अफू, चरस, ड्रॅगज, इंजेक्शन स्वरूपात केले जाणारे व्यसन. 

◆ व्हॅइटनेर व्यसन – जे व्हॅईटनेरच वास घेऊन केले जाणारे व्यसन.

◆ मोबाईलचे व्यसन – सतत मोबाईल बघणे.

◆ चांगली व्यसन -पुस्तके वाचणे, गाणे ऐकणे.

◆ वाईट संस्कार – ज्या ठिकाणी आपण राहतो, घरातल्या लोकांना आदर्श डोळयांसमोर ठेऊन घडत असतो तेही एक व्यसन आहे

              असे काही व्यसनाचे प्रकार मोडतात असे ते म्हणाले.

             पुढे ते म्हणाले नकारात्मक विचारसरणी यात आताच्या युवकांना झटपट यश हाव असत. जर तो नाही लवकर यशस्वी झाले किंवा नोकरी नाही लवकर मिळाली. तर ते व्यसनी बनतात. यातूनच झोप उडते ताणतणाव वाढत जातो व आरोग्य धोक्यात येते, असे ते म्हणाले.

           जर युवकानी मनात आणलं तर ते काहीही करू शकतात. व्यसनी लोकांनी मनावर ताबा ठेवणे, योगा प्राणायाम करणे, व्यसन करण्याची इच्छा निर्माण झाल्यावर त्यावेळेस दीर्घ श्वास घेणे सोडणे, नैराश्य दूर करण्यासाठी जे वाटत ते करावे, वाईट लोकांची संगत टाळणे, सकारत्मक गोष्टीचा विचार करणे असे जर गोष्टी आपण केले तर नक्की व्यसन सुटू शकते व निरोगी जीवन आपण जगू शकतो, असे ते म्हणाले यानंतर सरानी युवकांनी विचारलेल्या प्रश्नांचे निर्सन केले. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय