Thursday, August 11, 2022
Homeग्रामीणतळेरान येथे विविध विकासकामांचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न

तळेरान येथे विविध विकासकामांचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न

spot_imgspot_imgspot_imgspot_img

आदिवासी भागातील बांधवांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध – अतुल बेनके

जुन्नर / रफिक शेख : आदिवासी विभागातील बांधवांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. या भागासाठी अधिकचा विकास निधी मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मी आणि खासदार डॉ.अमोल कोल्हे आम्ही सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार अतुल बेनके यांनी केले.

तळेरान मधील बोरीचीवाडी येथे ३ कोटी ६९ लाख रूपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार बेनके बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, पंचायत समिती सभापती विशाल तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी “तळेरान मढ” या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याच्या कामांसाठी १ कोटी ६० लाख रुपये, निमगिरी – तळेरान मढ”रस्ता ४ किलोमीटर येथे नवीन पुलांचे बांधकाम करण्यासाठी २ कोटी ९ लाख रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय