Wednesday, August 17, 2022
Homeजिल्हादिघी ई कॉर्नर सेवा केंद्राचे खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन

दिघी ई कॉर्नर सेवा केंद्राचे खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन

spot_imgspot_imgspot_imgspot_img

दिघी : दिघीत नागरिकांना विविध प्रकारचे  शासकीय दाखले आणि महापालिका च्या सोयी सुविधा ऑनलाईन पध्दतीने देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते समाधान कांबळे यांच्या दिघी ई कॉर्नर सेवा केंद्राचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या उदघाटन प्रंसगी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की “तरूणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे त्यातून ही सर्व सामान्य लोकांची सेवा या माध्यमातून करता आली पाहिजे. या सेवा केंद्रातून नागरिकांना शासकीय दरात वाजवी सेवा देण्यात येईल.’

यावेळी भोसरी विधानसभा माजी आमदार विलास लांडे, नगरसेविका आशा सुपे, नगरसेवक चंद्रकांत वाळके, ज्ञानेश आल्हाट, सचिन दुबळे, धनाजी खाडे, संजय धुमाळ, हरीभाऊ लबडे, पुंडलिक सैंदाणे, के. के. जगताप, संदीप सोनावणे, अमोल देवकर, रवि पोहरे, प्रंशात कु-हाडे, संतोष वाळके, रमेश साबळे, सुनिता रेंगडे, उषा शेळके, स्वाती लबडे, स्वाती कांबळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन समाधान कांबळे व सूत्रसंचालन सुनील काकडे तर आभार सामाजिक कार्यकर्ते वसंत रेंगडे यांनी मानले.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय