Friday, April 26, 2024
Homeजिल्हाश्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर...

श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्री जयंती साजरी

पुणे : जनता शिक्षण संस्थेचे श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालय, दापोडीच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना, विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या सभागृहात महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ. सोमनाथ दडस, व इतर सहकारी प्राध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ दडस हे होते. मान्यवर व्याख्याते म्हणून प्रा. सिद्धार्थ कांबळे हे उपस्थित होते. अध्यक्ष व व्याख्याते यांचा सन्मान शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.

2 ऑक्टोबर महात्मा फुले व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त प्राध्यापक सिद्धार्थ कांबळे यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान झाले. त्यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांचा जीवनपट व कार्य, आचार-विचार, मूल्य, विशद केली.

जो व्याख्यानात बोलताना ते म्हणाले, ‘महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजेच १९६९ पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्व गुण विकास, चारित्र्य संवर्धन एकंदरीत सर्वांगीण विकास, करणे हा या योजने मागचा उद्देश आहे. महात्मा गांधींच्या तत्त्वावर चालणारी ही योजना आहे. त्यादृष्टीने सर्व विद्यार्थ्यांनी या योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रभारी प्राचार्य डॉ. सोमनाथ दडस म्हणाले, ‘महापुरुषांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असून त्यांची तत्वे, विचार-आचार, मूल्य, प्रत्येकाने आचरणात आणणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे समाजाला निश्चित दिशा मिळेल.’

       

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. निशा मोरे यांनी केले. तर आभार प्रा.दर्शन बागडे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ.बाळासाहेब माशेरे व इतर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी केले. 

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी प्रा. सुभाष सूर्यवंशी, प्रा. विदुला पुरंदरे, प्रा. सुरेखा हरपुडे, प्रा. ज्योती लेकुळे, प्रा अमरदीप गुरमे, वंदना दळवी, नंदाताई काशीद, कांताराम खामकर, लक्ष्मण मुरकुटे, लक्ष्मण कोहिनकर, हनुमंतराव गायकवाड, कपिल कांबळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम् ने करण्यात आली.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय