Amit shah : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे सर्व राजकीय पक्षांचे प्रचार वेग घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्यातील महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेत आता महिलांना 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यासोबतच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असून, शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजारांऐवजी 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत. प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पियुष गोयल, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांसह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.
संकल्पपत्रात महिलांसाठी आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देणार असल्याचं सांगण्यात आलं. महिला सुरक्षेसाठी पोलीस दलात 25,000 महिला अधिकारी समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, वृद्धांसाठी पेन्शन रकमेत वाढ करून आता 1500 ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार आहेत.
याशिवाय ग्रामीण विकासासाठी 45 हजार गावांमध्ये पांधण रस्ते बांधण्याचं आश्वासन देण्यात आलं असून, दर महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांचे विद्यावेतन देण्याचं आश्वासन देखील देण्यात आले आहे.
भाजपच्या या संकल्पपत्रात महिला, शेतकरी, विद्यार्थी, वृद्ध आणि गरजवंतांसाठी मोठ्या प्रमाणात आश्वासने दिल्याने जनतेत उत्सुकता आणि सकारात्मकता निर्माण झाली आहे.
Amit shah
हेही वाचा :
नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा
शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट
गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य
धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या
अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार
महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा
फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर