पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार, नवनाथ जगताप पाटील, शिवाजी पाडूळे, निखिल चव्हाण, पंकज कांबळे, यांनी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. (Breaking)
यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांचे मताधिक्य वाढणार आहे.
यावेळी उमेदवार राहुल कलाटे, मावळ लोकसभेचे शिवसेना समन्वयक संजोग वाघेरे, शहराध्यक्ष तुषार कामटे, युवा सेनेचे चेतन पवार, काँग्रेसचे कौस्तुभ नवले, महिला अध्यक्षा ज्योतीताई, सागर चिंचवडे आदी उपस्थित होते.
अरुण पवार यांनी प्रकाश इंगोले, शंकर तांबे, किशोर आट्टरगेकर, कॅप्टन बालाजी पांचाळ, प्रमोद आंग्रे (रेंट ट्रस्ट बायबल विद्यापीठ अभ्यासक), राहुल जाधव, सोमेश्वर झुमके, गजानन शिंदे, प्रणव खलाटे, ज्योती सगर, रमा सावते, नेहा सरपते, पल्लवी सरपते, कल्पना नवगिर, तेजस काळे, बालाजी शिंदे, राहुल शिंदे, विशाल वाघमारे, योगेश काळे, अरबाज शेख, रोहित शेख, अभिषेक साळवे, अभिजीत जाधव, लखन काळे, शिवा काळे, ऋषिकेश पांचाळ, अरबाज खान या सर्व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात हजारो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. (Breaking)
रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले, वृक्षमित्र समाजसेवक अरुण पवारला पवार उशिरा का होईना मिळाले. भाऊ भावाला मिळाला आम्हाला याचा आनंदच आहे. अरुण पवार यांच्या पक्ष प्रवेशाने चिंचवड विधानसभेचे उमेदवार राहुल कलाटे यांची ताकद वाढणार आहे.
उमेदवार राहुल कलाटे म्हणाले, की चिंचवड विधानसभा मतदारसंघात अरुण पवार यांचा दांडगा जनसंपर्क असून, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, रायगड , कोकण , पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आदिवासी समाज मित्रपरिवार आदी भागातून चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या मतदारांची मते मिळून मताधिक्य वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
संजोग वाघेरे पाटील म्हणाले, मराठवाडा भवनसाठी आणि शंभर मुलींचे वस्तीग्रह आणि शंभर मुलांचे वस्तीग्रह यासाठी १० गुंठे जागा अरुण पवार यांनी कुठल्याही फायद्याचा विचार न करता ६० फुटी डीपी रोड टच दान दिली, दातृत्व हे अरुण पवाराकडून समजून घ्यावे असे उदगार काढले असा कणखर कार्यकर्ता आम्हाला मिळाल्याने आमची ताकद वाढली आहे.
तुषार कामठे म्हणाले, आम्हाला एक सच्चा व विश्वासू कार्यकर्ता मिळाला आहे. अरुण पवार यांच्यामुळे आम्हाला भोसरी पिंपरी व चिंचवडमध्ये खूप मोठी मदत होणार आहे. अरुण पवार हे बोलण्यापेक्षा काम करून दाखवणारे कार्यकर्ते आहेत. शिवाजी पाडुळे यांच्या दांडग्या जनसंपर्काचा पक्षाला फायदा होणार आहे.
हेही वाचा :
छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण
धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर
नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा
शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट
गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य
धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या
अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार
महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा
फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर