Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याShirur : शिरूर लोकसभा मतदारसंघात "या" दोन उमेदवारांमध्ये सामना जवळपास निश्चित

Shirur : शिरूर लोकसभा मतदारसंघात “या” दोन उमेदवारांमध्ये सामना जवळपास निश्चित

Shirur Loksabha Election 2024 : शिरूर लोकसभा (Shirur) मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून डॉ. अमोल कोल्हे हे निवडणूकीच्या रिंगणात असणार आहेत. तर त्यांच्याविरोधात महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील उभे राहणार असल्याचे जवळपास ठरले आहे. फक्त घोषणा बाकी आहे.

शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडी आणि महायुती च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे.

शिवाजी आढळराव पाटील हे 1990 सालापर्यंत राष्ट्रवादीत होते. 2004 च्या निवडणुकीत खासदारकीसाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 3 वेळा खासदार राहिल्यानंतर 2019 ला राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हेंकडून आढळराव पाटील पराभूत झाले होते. त्यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांना 6,35,830 मते तर आढळराव पाटील यांना 5,77,347 मतं पडली होती. कोल्हेंनी तब्बल 58,483 मतांच्या फरकाने आढळरावांचा पराभव केला होता.

2022 ला आढळराव ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत गेले. आणि आता 2024 ला महायुतीत आढळराव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन लोकसभा लढणार असल्याचे समजते.

त्यामुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराल आढळराव पाटील यांच्यात सामना रंगणार असल्याचे जवळपास ठरले आहे. आता, जनता कोणाला कौल देणार हे येणार काळच सांगेल.

whatsapp link

हे ही वाचा :

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव

ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !

संबंधित लेख

लोकप्रिय