Friday, November 22, 2024
Homeराज्यमुंबईत भाजपच्या मंत्र्याने 500 घरांवर बुलडोझर चालवला, ना सर्व्हे, ना नोटीस

मुंबईत भाजपच्या मंत्र्याने 500 घरांवर बुलडोझर चालवला, ना सर्व्हे, ना नोटीस

मुंबई : देशभरातील अनेक राज्यात भाजपचे सरकार आहे, भाजप शासित अनेक राज्यांत वेगवेगळ्या कारणांसाठी लोकांच्या घरावर बुलडोझर चालविल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा मुंबईतील मालाड परिसरातील अंबुजवाडी टाऊनशिपमध्ये 400 ते 500 घरांवर बुलडोझर चालविल्याची घटना समोर आली आहे.

महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री मंगल लोढा यांच्या सांगण्यावरून गेल्या जूनच्या पहिल्या आठवड्यात अंबुजवाडी टाऊनशिपमधील घरांवर बुलडोझर चालविल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जवळपास 400 ते 500 घरांना तोडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक बेघर झाले असून त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या मंत्र्यावर एससी एसटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

अंबुजवाडी टाउनशिपमधील बहुतांश रहिवासी दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय असून त्यांनी आपल्या कष्टाने व घामाने घरे बांधली आहेत. ही घरे 20-20 वर्षे जुनी होती. अंबुजवाडीतील रहिवाशांनी या बेकायदेशीर व मनमानी कारवाईविरोधात व नुकसान भरपाईसाठी अनेकवेळा आंदोलने केली, मात्र त्यांचा आवाज कुणी ऐकला नाही.

1 जून आणि 6 जून 2023 रोजी बुलडोझर चालवण्यात आला तेव्हा त्यापूर्वीची सूचना टाऊनशिपमध्ये लावण्यात आली नव्हती. कोणतीही कारवाई करण्या अगोदर स्थानिक रहिवाशांना नोटीस देऊन माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र कोणतीही नोटिसा न देता लोकांची घरे पाडण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या संदर्भातील वृत्त ‘वर्कर युनिटी’ या वृत्त संस्थेने दिले आहे.

हे ही वाचा :

पश्चिम बंगाल मध्ये मणिपूरची पुनरावृत्ती; महिला उमेदवाराची विवस्त्र धिंड

ब्रेकिंग : ‘या’ 4 जिल्ह्यांना आज ‘रेड ॲलर्ट’ ; तर “या” जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’

डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांचा ‘लॉग मार्च’

भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार माहिती आहेत का? तर ‘हे’ आमदार सर्वात गरीब…यादी पहा !

हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राज्यात राबविण्याचा सरकारचा विचार

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने लवकरच सर्वंकष धोरण – गृहनिर्माणमंत्री अतुल सावे

सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

संबंधित लेख

लोकप्रिय